आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी भारताविरोधात अपप्रचार करणारे 22 यूट्यूब चॅनल ब्लॉक करण्याची धडक कारवाई केली. यात 4 पाकिस्तानी न्यूज चॅनलचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मंत्रालयाने सांगितले की, यूट्यूबवरील 22 न्यूज चॅनल भारताची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था व परराष्ट्र संबंधांविषयी अपप्रचार करत होते. त्यामुळे ते ब्लॉक करण्याची कारवाई करण्यात आली. यातील 18 भारतीय यूट्यूब चॅनल्सवर प्रथमच आयटी नियम -2021 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. यात एआरपी न्यूज, सरकारी बाबू, सरकारी बाबू, ऑनलाईन खबर, डीपी न्यूज, किसान तक, भारत मौसम, दिनभर की खबरे, डीजी गुरूकुल सारख्या भारतीय चॅनल्सचा समावेश आहे. दुसरीकडे, पाकच्या दुनिया मेरे आगे, गुलाम नबी मदनी, हकीकत टीवी, हकीकत टीवी 2.0 या 4 वृत्तवाहिन्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. या वाहिन्यांशिवाय 3 ट्विटर खाते, एक फेसबूक अकाउंट व एका न्यूज वेबसाईटलाही ब्लॉक करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.