आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:देशात तज्ज्ञ डॉक्टरांचा किती तुटवडा; सरकारच अनभिज्ञ, आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप संशोधन नाही

नवी दिल्ली / पवन कुमार7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात तज्ज्ञ डॉक्टरांचा किती तुटवडा; सरकारच अनभिज्ञ

अवयव प्रत्यारोपण, हृदय किंवा मेंदूवरील शस्त्रक्रिया व इतर गंभीर आजारांसाठी लोकांना नेहमी शहराची वाट धरावी लागते. मात्र मोठ्या रुग्णालयांत मोठ्या संख्येने असलेल्या रुग्णांमुळे शस्त्रक्रियेसाठी लवकर तारीखही मिळत नाही. देशात तज्ज्ञ डॉक्टरांचा असलेला मोठा तुटवडा यामागील मुख्य कारण आहे. एका अंदाजानुसार, केवळ सहा मोठ्या विभागांमध्येही तीन लाखांपेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा आहे. ग्रामीण भागातील स्थिती यापेक्षाही बिकट आहे.

संसदेच्या एस्टिमेट कमिटीने संसदेकडे सोपवलेल्या अहवालानुसार देशातील तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा निदर्शनास आणून दिल्यानंतरही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने याकडे लक्ष दिले नाही. देशातील तज्ज्ञ डॉक्टरांची तूट भरणे व ग्रामीण भागातील गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मॉडेलचा अभ्यास करण्याची सूचना केली आहे. मात्र मंत्रालयाने यावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

महाराष्ट्राचा उल्लेख यासाठी : महाराष्ट्र मॉडेलचा उल्लेख झाल्यावर येथील तज्ज्ञ डॉ. गिरधर ज्ञानी सांगतात की, देशामध्ये पाच हजारांहून जास्त कम्युनिटी हेल्थ सेंटर (सीएचसी) आहेत. यामध्ये ८० टक्के जागा रिक्त आहेत. मात्र महाराष्ट्रातील स्थिती वेगळी आहे. येथे एमबीबीएस डॉक्टरांना स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि रेडिओलॉजीमध्ये डिप्लोमा उपलब्ध आहे. या तिन्ही विभागांमध्ये डॉक्टरांची तूट भरून मातृ आणि शिशू मृत्युदरात घट करता येईल.

बातम्या आणखी आहेत...