आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाची तयारी:केंद्राने सीरम इन्स्टिट्यूटला दिली 1.10 कोटी लसींची ऑर्डर, एका डोसची किंमत 200 रुपये असेल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात
  • कोव्हिशील्ड व्हॅक्सिन 90% पर्यंत परिणामकारक असल्याचा अ‍ॅस्ट्राझेनेनचा दावा

केंद्र सरकारने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस कोविशिल्डची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर 1 कोटी 10 लाख लसींची आहे. लसीच्या एका डोसची किंमत 200 रुपये असणार आहे. दर आठवड्याला कोविशील्डच्या एक कोटीपेक्षा जास्त डोसचा पुरवठा केला जाऊ शकतो. SIIच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

DCGI ने 3 जानेवारीला दिली होती मंजुरी

देशभरात कोरोना लसीकरणाची तयारी सुरु करण्यासाठी 16 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (DCGI)ने 3 जानेवारी रोजी कोव्हिशील्डला मंजुरी दिली होती. त्याच्या प्रभावीतेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेने व्हॅक्सिन 90% पर्यंत परिणामकारक असल्याचा दावा केला होता. तथापि, ही लस 70% पर्यंत प्रभावी असल्याचा भारतीय नियामकांचा विश्वास आहे.

16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...