आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत सरकारने LoC वर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी पाकिस्तानी हाय कमीशनच्या अधिकाऱ्याला बोलावून विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानने केलेल्या कारवाईचा भारताने तीव्र निषेध केला. भारताने म्हटले की, की निष्पाप नागरिकांवर गोळीबार करणे अत्यंत खेदजनक आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानी लष्कराने भारतीय उत्सवाच्या वेळी नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. नागरिकांना लक्ष्य केले. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी हाय कमीशनच्या 'चार्ज द अफेयर्सला' समन्स बजावले होते. परराष्ट्र मंत्रालयानेही पाकिस्तानी उच्चायुक्तासमोर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा विषय उचलला. दहशतवाद्यांना मदत करून पाकिस्तानी सैन्य घुसखोरी करत असल्याचे सांगितले.
गोळीबारात BSF आणि लष्कराचे 5 जवान शहीद झाले, 6 नागरिकांचा मृत्यू
शुक्रवारी पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण बंदी (एलओसी) तोडला. पाकिस्तानच्या गोळीबारात BSF आणि लष्कराचे 5 जवान शहीद झाले होते. 6 नागरिकही मरण पावले आहेत. प्रत्युत्तरात सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या 3 कमांडोसमवेत 11 सैनिकांना मारले होते. अनेक पाकिस्तानी बंकर देखील भारतीय सैन्याने नष्ट केले होते. याशिवाय इंधन डंप व लाँच पॅडही नष्ट झाले. या हल्ल्यात सुमारे 16 पाकिस्तानी सैनिक जखमी झाले.
नोव्हेंबरमध्ये 128 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन
पाकिस्तानने या आठवड्यात दुसऱ्यांदा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. भारतीय आर्मीच्या सूत्रांनुसार, यावर्षी पाकिस्तानकडून 4052 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यापैकी नोव्हेंबरमध्ये 128 आणि ऑक्टोबरमध्ये 394 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात 3233 वेळा सीजफायरचे उल्लंघन झाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.