आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Government Of India To Ban Imported Goods At Army Canteens Foreign Liquor May Include

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्मनिर्भर भारताकडे अजून एक पाऊल:केंद्राने आर्मी कँटीनमध्ये विदेशी मद्यासह इम्पोर्टेड साहित्य विक्रीवर घातली बंदी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात जवळपास 4 हजार आर्मी कँटीन आहेत. यामध्ये डिस्काउंट रेट्सवर साहित्य मिळते.

केंद्र सरकारने देशाच्या 4 हजार आर्मी कँटीन्सला विदेशी साहित्य आयात न करण्याचा आदेश दिला. यामध्ये महागड्या विदेश मद्याचाही समावेश आहे. सरकारने हा निर्णय आत्मनिर्भर भारत अभियानानुसार घेतला आहे. स्थानिक वस्तुंचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयापूर्वी याविषयी तिन्ही सैन्यांचा सल्ला घेण्यात आला.

कँटीनमध्ये स्वस्त मिळते साहित्य
न्यूज एजेंसी रॉयटर्सनुसार, देशात जवळपास 4 हजार आर्मी कँटीन आहेत. यामध्ये डिस्काउंट रेट्सवर साहित्य मिळते. याचा फायदा वर्तमान आणि माजी सैनिकांना आणि त्याच्या कुटुंबियांना मिळतो. सामान्यतः विदेशी मद्य आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची मागणी जास्त असते. सरकारच्या निर्णयानंतर आता आर्मी कँटीनमध्ये विदेशी साहित्य विकले जाऊ शकणार नाही. यामध्ये विदेशी मद्याचाही समावेश आहे. आर्मी कँटीन देशातील सर्वात मोठ्या रिटेल चेन्समधून एक आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 200 कोटी रुपयांची विक्री होते.

काही दिवसांपूर्वी जारी झाला आदेश
19 अक्टोबरला संरक्षण मंत्रालयाने विदेशी वस्तुंच्या आयातीवर बॅन लावण्याचा आदेश जारी केला. यामध्ये म्हटले होते की, डायरेक्ट इम्पोर्ट केले जाऊ शकणार नाही. ऑर्डरनुसार, याविषयी आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीसह मे आणि जुलैच्या दरम्यान चर्चा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

प्रोडक्ट्सची माहिती दिली नाही
ज्या उत्पादनांवर बंदी घातली जाईल अशा वस्तूंबद्दल सध्या या ऑर्डरमध्ये माहिती नाही. मात्र, त्यात विदेशी मद्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कॅन्टीनमध्ये विकल्या गेलेल्या उत्पादनांपैकी सुमारे 7% उत्पादने इम्पोर्टेड असतात. यामध्ये डायपर, व्हॅक्यूम क्लीनर, हँडबॅग आणि लॅपटॉप अशा चीनमधून आयात केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. परदेशी दारूचा पुरवठा करणार्‍या दोन कंपन्यांचे ऑर्डर मिळणे जूनपासूनच कमी झाले होते.