आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government Of India Will Consider Increasing The Marriage Age Of Girls, One Third Daughters Will Join 1 Lakh New NCC Cadets

मुलींचे लग्नाचे वय बदलण्याचे संकेत:मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यावर विचार करणार भारत सरकार, 1 लाख नवीन एनसीसी कॅडेटमध्ये शामिल होणार एक तृतियांश मुली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता भारतीय लष्करामध्ये आणि भारतीय नौदलात महिलांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध आहेत

74 व्या स्वातंत्र्य दिवसावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलींच्या लग्नाची वय बदलण्याच्या विषयावर भाष्य केले आहे. आता मुलींचे लग्नाचे वय 18 ने वाढवून 21 केले जाऊ शकते. यामुळे मुलींच्या आयुष्यात अनेक बदल होऊ शकतील.

पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी म्हटले की, आम्ही मुलींच्या लग्नाचे कमीत कमी वयावर पुनर्विचार करत आहोत. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीद्वारे आपला रिपोर्ट प्रस्तुत सरकार योग्य निर्णय घेतील. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात भारत सरकारद्वारे महिला सशक्तिकरणवर जोर देण्याविषयी आणि महिलांना देण्यात येणाऱ्या संधींविषयी भाष्य केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, एनसीसीमध्ये मुलींना अजून प्रोत्साहन देण्यावर भर दिला जातोय. पंतप्रधानांनी यादरम्यान एनसीसीच्या विस्ताराविषयी भाष्य केले. त्यांच्यानुसार एक लाख एनसीसी कॅडेटला स्पेशल ट्रेनिंग दिली जाईल. ज्यामध्ये एक तृतियांश मूली सामिल आहेत.

पंतप्रधान म्हणाले, 'भारतात जेव्हा जेव्हा महिलांना संधी असते तेव्हा त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. देशाला बळकटी दिली आहे. आज देश महिलांना स्वरोजगार आणि नोकरीच्या समान संधी उपलब्ध करुन देण्यास कटिबद्ध आहे. आज भारतातील महिला भूमिगत कोळसा खाणींमध्ये काम करत आहेत. आज माझ्या देशाच्या मुली लढाऊ विमानात उड्डाण करत आहेत आणि उंच आकाशाला स्पर्श करत आहेत. नौदल आणि हवाई दलात महिलांना महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...