आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government Of Tamil Nadu To Provide Training; The Women Had Filed A Petition In The Madras High Court; News And Live Updates

मंदिरात महिला पुजारी:​​​​​​​तामिळनाडूतील सरकार देणार प्रशिक्षण; महिलांनी मद्रास हायकोर्टात दाखल केली होती याचिका

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मंजुरीनंतर त्यांना प्रशिक्षणाचा प्रस्ताव दिला जाईल

तामिळनाडूतील मंदिरांमध्ये महिलांनाही पुजारी नियुक्त केले जाईल. सरकारने म्हटले आहे की, जर एखाद्या महिलेला मंदिरात पुजारी व्हायचे असेल तर सरकार त्यांचा ‘अर्चकार कोर्स’ करेल. तामिळनाडू सरकारचे हिंदू धार्मिक व धर्मार्थ विभागाचे मंत्री पी. के. सेकरबाबू यांनी सांगितले की, महिलादेखील समाजाचा भाग आहेत, त्याही पुजारी होण्याची अपेक्षा बाळगू शकतात. विभागाकडून संचालित सर्व मंदिरांमध्ये कोणीही हिंदू पुजारी होऊ शकतो तर महिलाही होऊ शकतात. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मंजुरीनंतर त्यांना प्रशिक्षणाचा प्रस्ताव दिला जाईल. अनेक महिलांनी मद्रास हायकोर्टात मंदिरात पूजेसाठी परवानगीसाठी याचिका दाखल केली होती.

डीएमके सरकारने घोषणा केली होती की, सरकारला १०० दिवस पूर्ण होण्याआधी ब्राह्मणेतर प्रशिक्षित पुजाऱ्यांना सरकार संचालित मंदिरांत नियुक्त केले जाईल. मंत्र्यांनी सांगितले, राज्यातील मंदिरातील पुजाऱ्यांच्या रिक्त पदांची माहिती सरकार गोळा करत आहे. लवकरच ब्राह्मणेतर प्रशिक्षित पुजाऱ्यांसह योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यांनी सांगितले की, सरकार मद्रास हायकोर्टाच्या शिफारशी लागू करत आहे. राज्यात सरकार संचालित ४७ मंदिरांत तमिळ पुजारी सेवा देत आहेत, या सर्व मंदिरांमध्ये लवकरच फलक लावला जाईल की, या मंदिरात तामिळ परंपरेने पूजा केली जाते. या फलकावर पुजाऱ्याचे नाव व क्रमांकही असेल.

विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तामिळनाडूतच कांचीपुरम जिल्ह्यातील मेलमारुवथुर आणि विलुप्पुरम जिल्ह्यातील मेलमलयनुरच्या मंदिरात महिला पुजारी आहेत. काही वर्षांपूर्वी कर्नाटकातील मंगलौरच्या मंदिरात दलित महिलेला पुजारी करण्यात आले होते. देशाच्या अनेक भागांत मंदिरात पारंपरिक पद्धतीने महिलांनाच पूजेची परवानगी आहे. तामिळ संस्कृतीचे जाणकार सांगतात की, परंपरेनुसार मंदिरांमध्ये महिलांना प्राधान्य दिले जायचे, मात्र आर्यांनी ते बंद करून महिलांसोबत भेदभाव सुरू केला. यामुळे सरकारद्वारा महिलांचे महत्त्व, गौरव व परंपरेची पुनर्स्थापना कौतुकास्पद आहे.

बातम्या आणखी आहेत...