आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Government Ordered To Priyanka Gandhi To Vacate Government Bungalow Till August 1

आदेश:प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्टपर्यंत सरकारी बंगला सोडण्याचे आदेश, बंगला न सोडल्यास सरकार भाडे वसुलणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचे कारण दाखवून सरकारने हे निर्देश दिले

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेट भागात असलेला सरकारी बंगला १ ऑगस्टपर्यंत सोडावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय निवासस्थान मंत्रालयाच्या वतीने यासंबंधीचे पत्र काढण्यात आले असून या मुदतीनंतरही प्रियंका या बंगल्यात राहिल्या तर त्यांना याचे भाडे किंवा दंडही द्यावा लागेल.

एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचे कारण दाखवून सरकारने हे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. आता त्यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, झेड प्लस सुरक्षा असेल तर अशा नेत्यांना सरकारी निवासस्थान दिले जात नाही. यामुळे प्रियंका यांना निवासस्थान सोडण्यास सांगण्यात आले आहे.

0