आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Government Orders Inquiry Into Rajiv Gandhi Foundation, Indira Gandhi Memorial Trust, Forms Committee For Inquiry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात:राजीव गांधी फाउंडेशन, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या चौकशीचे सरकारनं दिले आदेश, चौकशीसाठी समितीची स्थापना

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजीव गांधी ट्रस्टवर काही दिवसांपूर्वी भाजपने चीनमधून डोनेशन घेतल्याचा आरोप लावला होता
  • आता गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशन आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला

राजीव गांधी फाउंडेशन अँड चॅरिटेबल आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या चौकशीचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. गृह मंत्रालयाने यासाठी एक इंटर मिनिस्ट्रीयल समितीची स्थापना केली आहे. ही समिती समन्वय साधेल. या चौकशीचे प्रमुख ईडीचे विशेष संचालक असतील. गांधी कुटुंबातील या दोन ट्रस्टने नियमांचे उल्लंघन केले की नाही याची माहिती मिळू शकेल. काही दिवसांपूर्वी राजीव गांधी फाउंडेशनला चिनी दूतावासाकडून देणगी मिळाली असल्याचा आरोप भाजपने केला होता.

तीन ट्रस्टची केली जाणार चौकशी 

वृत्तानुसार, एकूण तीन ट्रस्टची चौकशी केली जाईल. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या त्या तीन ट्रस्ट आहेत. या ट्रस्टने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा आणि प्राप्तिकर नियम तोडल्याचा आरोपही केला जात आहे.

ईडीचे विशेष संचालक करतील नेतृत्त्व

मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक या पथकाचे नेतृत्व करतील. काही दिवसांपूर्वी राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून देणगी मिळाली असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला होता. मात्र कॉंग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आणि म्हटले की, चीन चीनबरोबरच्या सीमेच्या वादाच्या मुद्द्यावरुन लक्ष वळविण्यासाठी भाजप असे आरोप करीत आहे.

गृह मंत्रालयाने केली पुष्टी 

गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की - चौकशी दरम्यान आंतर मंत्रालयीन समिती कोऑर्डिनेशन करेल. पीएमएलए, आयकर कायदा आणि एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केले की नाही याची माहिती घेतली जाईल. ईडीचे विशेष संचालक तपास पथकाचे नेतृत्व करतील.

राजीव गांधी फाउंडेशन म्हणजे काय?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे उद्दीष्ट पुढे नेण्यासाठी सोनिया गांधी यांनी 21 जून 1991 रोजी याची सुरुवात केली होती. ही फाउंडेशन शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार, वंचितांचे आणि अपंगांच्या सबलीकरणासाठी कार्य करते. ट्रस्टचे कामकाज हे डोनेशनमधून मिळणाऱ्या रकमेवर चालते. सोनिया गांधी याच्या अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याव्यतिरिक्त राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पी. चिदंबरम हे विश्वस्त आहेत.

आता चर्चेत का?

चीनच्या मुद्दय़ावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसने प्रश्न केला होता. त्याला उत्तर म्हणून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजीव गांधी फाउंडेशन आणि चीनमध्ये संबंध असल्याचे सांगितले. राजीव गांधी फाउंडेशनला 2005-2006 मध्ये चीनकडून 3 लाख डॉलर (तेव्हा 90 लाख रुपये) मिळाल्याचे नड्डा यांनी गुरुवारी सांगितले होते. त्या बदल्यात, फाऊंडेशनने चीनबरोबर मुक्त व्यापारास प्रोत्साहन देणारी स्टडी करुन घेतली. असेही नड्डा म्हणाले. तसेच यूपीए सरकारच्या काळात सरकारी निधी राजीव गांधी फाउंडेशनकडे वळविला गेला. असा आरोपही नड्डा यांनी केला होता. 

बातम्या आणखी आहेत...