आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजाबवरील वाद:कर्नाटकमध्‍ये सरकारने फेटाळला मुस्लिम शाळा निर्मिती प्रस्ताव

विनय माधव | बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये हिजाब वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता हिजाब परिधान करून स्वतंत्र शाळा स्थापन्याबाबतचे नवे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात घेरल्यानंतर सरकार आता बचाव करताना दिसत आहे. परिणामी, राज्य सरकारने विविध जिल्ह्यांत मुस्लिम मुलींसाठी १० शाळा उघडण्याचा कर्नाटक वक्फ बोर्डाचा प्रस्ताव फेटाळला आहे. राज्याचे वक्फ आणि धार्मिक प्रकरणांच्या मंत्री शशिकला जोले यांनी या प्रस्तावाची माहिती नसल्याचे सांगते बोलणे टाळले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, सरकारसमोर प्रस्ताव ठेवला नव्हता आणि ते अशा प्रस्तावाच्या बाजूने नाहीत.

कर्नाटकचा किनारपट्टीवरील जिल्हा उडीपीमधील हिजाब वादानंतर मुस्लिम मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याची तयारी सुरू होती. तेथे शाळा प्रशासनाकडून मुलींना हिजाब घालून शाळेत येण्याची परवानगी दिली जावी. गेल्या काही दिवसांत शाळा प्रशासनाच्या ड्रेस कोडसंदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याची मागणी सुरू केली होती. वक्फ बोर्डाने प्रकरण गांभीर्याने घेत मुस्लिम मुलींसाठी स्वतंत्र शाळेचा प्रस्ताव तयार केला होता. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मोहंमद शाफी सादी यांनी मंगळूर, कोगाडू, चिकमंगळूर, विजयपुरा,बेळगाव, उडीपी, शिवमोगा, रायचूर, कोप्पल आणि कलबुर्गीत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली होती.

त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे शाळा सुरू करण्यासाठी संस्थांकडून प्रस्ताव आले होते. त्यात मुस्लिमांशिवाय अन्य मुलीही शिकू शकतात. सादी यांच्या या वक्तव्याला हिंदू संघटनांनी विरोध केला आहे.

वक्फच्या निर्णयाकडे सीएम व मंत्र्यांचे दुर्लक्ष {पंतप्रधानांच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ प्रचाराअंतर्गत या शाळा सुरू करण्याची योजना होती. ६ महिन्यांआधी बोर्डाने हा निर्णय घेतला होता. { या कामासाठी वक्फ बोर्डाला २५ कोटी िनधी हवा होता. सरकार त्यास नकार देणार नाही,अशी अपेक्षा संघटनेला होती. {मुख्यमंत्री म्हणाले,अशा संस्थांची स्थापन करण्यास मंजुरी दिली जाऊ शकत नाही. हा एक प्रस्ताव नाही तर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाचे विचार होते. { श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले, सरकार वक्फ बोर्डाचा प्रस्ताव स्वीकारत असेल तर राज्यभर आंदोलन केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...