आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government School Children Selected To Build School Satellites Are Trained In Coding As Engineers, Working In High tech Labs.

मंडे पॉझिटिव्ह:शालेय उपग्रह बनवण्यासाठी निवड झालेल्या सरकारी शाळेची मुले कोडिंगमध्ये अभियंत्यासारखी तरबेज, हायटेक लॅबमध्ये करतात काम

बंगळुरू / मनोरमा सिंह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगळुरूतील सरकारी शाळेचे विद्यार्थी इस्रोच्या मदतीने तयार करताहेत 75 उपग्रह

बंगळुरूतील मल्लेश्वरम शासकीय मुलांच्या शाळेची निवड ७५ उपग्रह बनवण्यासाठी करण्यात आली आहे. या उपग्रहांचे प्रक्षेपण पुढील वर्षी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनी होईल. हायटेक अटल टिंकरिंग लॅबमुळे हे शक्य झाल्याचे मुख्याध्यापिका लीला जीपी सांगतात. कर्नाटकात अशा लॅब असलेल्या फक्त तीन शाळा आहेत. लीला सांगतात, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत शाळेच्या मुलांच्या काही प्रकल्पांची टॉप-५० मध्ये निवड झाली. यामुळे शाळेला केंद्र सरकार आणि नीती आयोगाकडून अटल टिंकरिंग लॅब मिळाली. ही प्रयोगशाळा सर्वांसाठीच आहे, मग तो मुलगा दुसऱ्या शाळेचा असला तरी. येथे सतत प्रयोग होत असतात. लॉकडाऊनमध्ये काही अडचणी आल्या, मात्र आता मुले येथे येऊन शास्त्रज्ञांसारखी प्रयोगात सहभागी होतात, शिकतात. कनिष्ठांनाही शिकवतात. यासाठी आयटी कंपनी डेलची तांत्रिक मदत होत आहे. सॉफ्टवेअरही देत आहे.

इंडियन टेक्नॉलॉजी काँग्रेस असोसिएशन आणि इस्रो सतत शाळेच्या संपर्कात आहे. शिक्षणा फाउंडेशन आणि सीएन अश्वत्नारायण फाउंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांचेही शाळेच्या कामगिरीत महत्त्वाचे याेगदान आहे. त्यांनी लॉकडाऊनदरम्यान शाळेतील १००० गरीब मुलांना उच्च क्षमतेचे टॅब दिले. शिक्षणा फाउंडेशनचे नवीन सांगतात, लवकरच शाळेतील प्रत्येक पाचव्या मुलाला हायएंड लॅपटॉप दिला जाईल. फाउंडेशनचे चेतनसारखे सदस्य थेट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

प्रयोगशाळाप्रमुख मैत्रा एस. पी. हा प्रकल्प राबवण्यासाठी वर्षभरापासून व्यग्र आहेत. त्या म्हणतात, येथे येऊन लोकांना मुलांची प्रतिभा बघता येईल. विशेषत: कोडिंगच्या संदर्भात. येथील मुलांचे कोडिंगचे ज्ञान अभियंत्यांसारखे आहे. उपग्रह प्रकल्पात सहभागी दहावीतील अमित झारखंडच्या बोकारोतील आहे. त्याची आई लोकांच्या घरी कामाला आहे, तर वडील मजुरी करतात. अमित याच सरकारी शाळेत राहून कोडिंगमध्ये तरबेज झाला आहे. उत्तम इंग्रजी बोलतो. तसेच शिवकुमार हा विद्यार्थी सायन्स प्रोजेक्टमध्ये आहे. ही मुले संगणक अभियंता होण्याच्या तयारीला आतापासूनच लागली आहेत.

या वर्षापासून मुलांच्या या शाळेत मुलींनाही दिला जात आहे प्रवेश
चांगले शिक्षण सर्वांचा अधिकार आहे हे लक्षात घेऊन मुलांच्या या शाळेत आता मुलींनाही प्रवेश दिला जात आहे. उपग्रह प्रकल्पात आठवी ते दहावीची मुले काम करतील. प्रकल्पात मुलींनाही सामील केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...