आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारधाम यात्रेकरूंची संख्या पहिल्यांदाच 50 लाख पार:साहसी पर्यटन वाढवण्यावर सरकारचा भर

डेहराडून5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगप्रसिद्ध चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी या वेळी विक्रम केला आहे. सरकारी आकड्यांनुसार या वेळी ५० लाखांपेक्षा जास्त यात्रेकरू चारधामला आले. उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी सांगितले की, यात्रेकरूंची विक्रमी संख्या लिम्का बुकमध्ये नोंदवण्याची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी ही संख्या २० लाखांपेक्षा कमी होती. बद्रीनाथ धामचे दरवाजे १९ नोव्हेंबरला बंद होईल. तोवर येथे यात्रेकरूंचे येणे सुरू राहील. गंगोत्री धाम, यमुनोत्री धाम व केदारनाथ धामचे दरवाजे बंद झाले आहेत. उत्तराखंड सरकारचा भर आता हिवाळी चारधाम यात्रा व साहसी पर्यटनावर राहील.

बातम्या आणखी आहेत...