आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळात CM-राज्यपाल समोरासमोर:स्मगलिंग करणाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे संरक्षण -राज्यपाल आरिफ खान यांचा आरोप

तिरुवनंतपुरमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळचे मुख्यमत्री पिनरई विजयन व राज्पाल आरिफ मोहम्मद खान एकमेकांपुढे उभे टाकलेत. राज्यपालांनी गुरुवारी राज्यातील तस्करांना मुख्यमंत्री कार्यालयाचे अभय मिळत असल्याचा आरोप केला. तसेच विद्यापीठांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांची भरती करत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपांत तथ्य निघाले, तर मी राज्यपालपदाचा राजीनामा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल आरिफ विद्यापीठातील कुलगुरुंच्या नियुक्तीत राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री विजयन यांनी नुकताच केला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपाल बोलत होते.

आरिफ म्हणाले - CM राजीनामा देणार का?

गव्हर्नर आरिफ म्हणाले की, कुलगुरु पदासाठी RSSच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीला नॉमिनेट केले तर तत्काळ मी राज्यपालपदाचा राजीनामा देईल. पण मुख्यमंत्र्यांना आपले आरोप सिद्ध करता आले नाही तर ते आपले पद सोडतील काय?

आरिफ पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री माझ्यावर एक समांतर सरकार चालवण्याचा आरोप करत आहेत. तसेच स्वतः शैक्षणिक व्यवस्था चांगली करत असल्याचा दावाही करत आहेत. विद्यापीठांतील रिक्त जागावर आपल्या पक्षांच्या नेत्यांच्या अपात्र नातेवाईकांची भरती करून ते व्यवस्था चांगली करत आहेत का? असा माझा सवाल आहे.

CMOचा स्मगलर्सना पाठिंबा

आरिफ खान म्हणाले की, मी केव्हाच राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप केला नाही. पण मुख्यमंत्री कार्यालय तस्करांना संरक्षण देत असल्याचे माझ्या निदर्शनास येत आहे. राज्य सरकार, सीएमओ व मुख्यमंत्र्याच्या निकटवर्तीयांनी तस्करांना अभय देण्याचा प्रयत्न केला तर मी निश्चितच हस्तक्षेप करेल.

राज्यपाल आरिफ खान म्हणाले की, CMO व CM च्या निकटवर्तीयांचा तस्करीत हात असेल तर मी निश्चितच हस्तक्षेप करेल.
राज्यपाल आरिफ खान म्हणाले की, CMO व CM च्या निकटवर्तीयांचा तस्करीत हात असेल तर मी निश्चितच हस्तक्षेप करेल.

राज्यपालांकडून RSS चा शस्त्रासारखा वापर -CM विजयन

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन गत 10 ऑक्टोबरला म्हणाले होते की, राज्यपाल आरिफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एखाद्या शस्त्रासारखा वापर करत आहेत. ते राज्याच्या विद्यापीठांत हस्तक्षेप करून आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहेत. हे घटनाबाह्य असून, कुलगुरुंच्या अधिकारांत हस्तक्षेप आहे. राज्यपाल पद सरारविरोधात नव्हे तर संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आहे.

राज्यपाल यांना उपकुलगुरुंना हटवण्याचा अधिकार नाही. विद्यापीठ कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही, असेही ते म्हणाले होते.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांवर विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचा आरोप केला होता.
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांवर विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचा आरोप केला होता.

राज्यपालांनी 9 कुलगुरुंकडून राजीनामा मागितला होता

केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी राज्यातील 9 कुलगुरुंना 10 ऑक्टोबर सकाळी 11.30 वाजेपर्यंत राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा वाद केरळ हाय कोर्टापर्यंत पोहोचला होता. सर्वच 9 कुलगुरुंनी आपल्या राजीनाम्याच्या आदेशांना स्थगिती देण्याची मागणी केली होती.

राज्यपालांनी जारी केलेल्या शोकॉज नोटीसीनंतर अंतिम आदेश येईपर्यंत सर्वच कुलगुरुंना आपल्या पदावर राहता येईल, असे हाय कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...