आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Governor Jagdeep Dhankhad To Be Sent To Jail After Retirement TMC MP Kalyan Banerjee

तृणमूल vs राज्यपाल वाद:राज्यपाल जगदीप धनखड निवृत्त झाल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवू - बॅनर्जी

कोलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगालचे राज्यपाल म्हणाले, या वक्तव्याने मी स्तंभित झालो

राज्यपाल जगदीप धनखड निवृत्त झाल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करू, असे वक्तव्य तृणमूल कांॅग्रेसचे (टीएमसी) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केले अाहे. धनखड यांच्याविराेधात जवळच्या पाेलिस ठाण्यात जाऊन जास्तीत जास्त तक्रारी दाखल करा, जेणे करून त्यांना त्याच प्रेसिडेन्सी कारागृहात पाठवता येऊ शकेल, जेथे त्यांनी अापल्या नेत्यांना पाठवले, असे बॅनर्जी यांनी हुगळीतील अापल्या कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान, राज्यपाल धनखड यांनी या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

एक ज्येष्ठ नेते, एक खासदार अाणि एक ज्येष्ठ वकिलाच्या अशा खुलेअाम बाेलण्यामुळे अापण स्तंभित झालाे अाहाेत. पण हा मुद्दा अाता बंगालची जनता अाणि माध्यमांवर साेडून दिला पाहिजे, असे राज्यपालांनी साेशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले अाहे. बॅनर्जी म्हणाले, २०२४ च्या लाेकसभा निवडणुकीनंतर अनेक भाजप नेते तुरुंगात असतील. त्यामध्ये धनखड यांचाही समावेश असेल. त्यांच्याच अादेशानुसार नारद स्टिंग प्रकरणात टीएमसीच्या नेत्यांना अटक करण्यात अाली हाेती.

सोनाली गुहानंतर अाता सरला म्हणाल्या, साॅरी दीदी, चूक झाली
तृणमूलच्या माजी नेत्या सोनाली गुहा यांच्यानंतर अाता सरला मुर्मू यांनी तृणमूल पक्षात परत येण्याची विनंती केली अाहे. भाजपमध्ये गेलेल्या सरला यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे माफी मागितली अाहे. दीदीने मला माफ करावे अशी माझी इच्छा अाहे असे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...