आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका आयपीएस अधिकाऱ्याची प्रकृती अचानकच बिघडली. यादरम्यान फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी त्यांचे प्राण वाचवले. 1994 च्या बॅचचे अधिकारी कृपानंद त्रिपाठी उजेला यांना डेंग्यू झालेला होता. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर मध्यभागी त्यांना खूप ताप आला, तापामुळे कृपानंद यांना अस्वस्थ वाटू लागले.
आयपीएस अधिकारी कृपानंद यांना अडचणीत पाहून राज्यपालांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि विमान हैदराबादला पोहोचेपर्यंत त्यांची काळजी घेतली. तेलंगणाचे राज्यपाल या व्यवसायाने डॉक्टर आहेत.
कृपानंद यांच्या प्लेटलेट्स 14 हजारपार
विमान हैदराबादला पोहोचताच कृपानंद यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तपासणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांची प्लेटलेट संख्या 14,000 पर्यंत घसरली होती. कृपानंद म्हणाले, जर शनिवारी फ्लाइटमध्ये गव्हर्नर मॅडमने मला मदत केली नसती, तर मला माहित नाही काय झाले असते. प्रवासात त्यांनी माझी आईसारखी काळजी घेतली, त्या नसत्या तर मी हॉस्पिटलमध्ये कधीच वेळेवर पोहोचू शकलो नसतो.
कृपानंद म्हणाले - मॅडमने मला नवजीवन दिले
आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा गव्हर्नर मॅडम यांनी माझ्या हृदयाचे ठोके मोजले तेव्हा मला श्वास घेण्यास त्रास होत होता. यावर त्यांनी मला पुढील बाजूस वाकण्याचा सल्ला दिला, त्यामुळे माझा श्वास स्थिर झाला. आता कृपानंद यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते राज्यपालांचे आभार मानले. ते म्हणाले की, मॅडम त्या फ्लाईटमध्ये नसत्या तर मी वाचलो नसतो. त्यांनीच मला नवीन जीवन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.