आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगण सरकारवर आरोप:राज्यपाल म्हणाल्या, स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्याची परवानगी नव्हती

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी राज्यातील टीआरएस सरकार आपल्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. महिला राज्यपालांसोबत कसा भेदभाव केला गेला हे राज्याच्या इतिहासात लिहिले जाईल, असे त्या म्हणाल्या. राज्यपाल म्हणून तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी राजभवनात बोलताना सौंदरराजन म्हणाल्या की, त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात बोलू दिले गेले नाही आणि प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकवण्याचीही परवानगी नव्हती.

मुख्यमंत्री राव कार्यक्रमाला आले नाही : सौंदरराजन म्हणाल्या की, नुकतीच दक्षिणेकडील राज्यांची बैठक झाली. यामध्ये मी, पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर उपस्थित होते. यामध्ये आंध्रसह दक्षिणेचे इतर मुख्यमंत्री आले, पण तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...