आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळ विधानसभेने राज्यपालांना राज्यातील विद्यापीठांच्या कुलपती पदावरून हटवण्याचा ठराव मंजूर केला आहे. गेल्या महिन्यातच केरळ सरकारने राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना राज्याच्या कुलपती पदावरून हटवले होते.
सरकारने 10 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या नियमांमध्ये सुधारणा करून राज्यपालांना कुलपती पदावरून हटवण्याची परवानगी दिली. आता या पदावर कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे.
आरएसएस समर्थक कुलगुरूंची नियुक्ती केल्याचा आरोप
मुळात ऑक्टोबरमध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या वतीने राज्यातील 9 विद्यापीठांच्या कुलगुरूंकडे राजीनामे मागितले होते. या मुद्यावरून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि राज्यपाल यांच्यात वाद सुरू झाले. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांवर राज्याच्या विद्यापीठांमध्ये RSS समर्थक कुलगुरूंची नियुक्ती केल्याचा आरोप केला होता.
तस्करांना मुख्यमंत्री कार्यालयाचे अभय- राज्यपालांचा आरोप
केरळचे मुख्यमत्री पिनरई विजयन व राज्यपाल आरिफ मोहम्मद खान एकमेकांपुढे उभे टाकलेत. राज्यपालांनी राज्यातील तस्करांना मुख्यमंत्री कार्यालयाचे अभय मिळत असल्याचा आरोप केला. तसेच विद्यापीठांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांची भरती करत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपांत तथ्य निघाले, तर मी राज्यपालपदाचा राजीनामा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल आरिफ विद्यापीठातील कुलगुरुंच्या नियुक्तीत राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री विजयन यांनी नुकताच केला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी व्यक्तव्य केले होते. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.