आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Govt Allows Hospitals, COVID Care Centres To Accept Cash Payments Of Over Rs 2 Lakh

कॅश पेमेंटची परवानगी:कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल 2 लाखांपेक्षा जास्त पेमेंटही कॅश घेऊ शकणार, सरकारने दिली मंजूरी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशा प्रकारच्या इंस्टीट्यूटला रुग्ण आणि पेमेंट करणाऱ्याचे पॅन किंवा आधार कार्ड घ्यावे लागेल.

कोरोना रूग्णांवर उपचार करणारे रुग्णालये, दवाखाने आणि कोविड केअर सेंटर आता दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंट रोख घेण्यास सक्षम असतील. शुक्रवारी केंद्र सरकारने त्यास मान्यता दिली. ही सवलत 31 मे पर्यंत असेल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस (CBDT)ने नोटिफिकेशन जारी करुन म्हटले की, अशा प्रकारच्या इंस्टीट्यूटला रुग्ण आणि पेमेंट करणाऱ्याचे पॅन किंवा आधार कार्ड घ्यावे लागेल. यासोबतच रुग्ण आणि पेमेंट करणाऱ्यामध्ये काय नाते आहे ही माहिती देखील घ्यावी लागेल.

CBDT ने म्हटले की, या आदेशाच्या व्याप्तीमध्ये रुग्णालये, नर्सिंग होम, कोविड केअर सेंटर किंवा कोरोनावर उपचार करणार्‍या इतर तत्सम वैद्यकीय सुविधा समाविष्ट असतील. ते सर्व रुग्णांकडून आयकर अधिनियम, 1961 ची कलम 269ST नुसार रोख पेमेंट घेऊ शकतात.

हॉस्पिटल करत आहेत मागणी
चार्टर्ड अकाउंटेंट शैलेश कुमार यांनी सांगितले की, या वेळी अनेक रुग्णालये आणि नर्सिंग होम कोरोनाच्या उपचारासाठी रोख रक्कम मागत आहेत. मात्र आयकर कायद्याच्या कलम 269ST नुसार 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंटची परवानगी नाही.

ते म्हणाले की, असामान्य साथीची परिस्थिती लक्षात घेता जनतेचे प्राण वाचवणे आवश्यक आहे. लोकांच्या अडचणी लक्षात घेता सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे, जेणेकरुन त्यांना कोरोनावरील उपचारांसाठी अधिक रोख देय परवानगी मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...