आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Govt On CORONA; 222 Workers Special Trains Were Run, Two And A Half Million People Benefited; More Than 16 Thousand People Recovered, Recovery Rate Reached 29.36%

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर सरकार:222 स्पेशल ट्रेन्समुळे अडीच लाख नागरिकांना फायदा झाला; 7 दिवसानंतर रिकव्हरी रेट 4% वाढून 29.36% वर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य मंत्रालयानुसार 24 तासात 3390 नवीन संक्रमित वाढले आहेत, तर 1273 कोरोनामुक्त झाले

देशातील कोरोनाची परिस्थिती सांगण्यासाठी सरकार दररोज प्रेस ब्रीफिंग करते. गृह मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, आतापर्यंत 222 श्रमिक स्पेशल ट्रेन्सनी अडीच लाख नागरिकांना फायदा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 42 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांपासून कोणताच नवीन रुग्ण सापडला नाही. 29 जिल्ह्यात मागील 21 दिवसात, 36 जिल्ह्यात 14 दिवसात आणि 46 जिल्ह्यात 7 दिवसात नवीन एकही रुग्ण नव्हता. रिव्हकरी रेट 29.36% झाला आहे. प्रत्येक तीन व्यक्तींमध्ये एक व्यक्ती ठीक झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, 24 तासात कोरोनाचे 3390 नवीन रुग्ण समोर आले असून 1273 रुग्ण ठीक झाले आहेत. आतापर्यंत देशभरात 16 हजार 540 लोक ठीक झाले, तर 37 हजार 916 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेने 5231 कोच कोविड- केअर सेंटरसाठी तयार केले आहेत. 215 रेल्वे स्टेशनवर हे सेंटर असतील. क्रॉस इंफेक्शनपासून वाचण्यासाठी वेगवेगळे कोच तयार करण्यात आले आहेत. 85 स्टेशनवर हेल्थ केअर स्टाफ रेल्वेकडून दिले जातील. यासाठी 2500 डॉक्टर आणि 35 हजार स्टाफ आहेत.

स्वदेशी टेस्टिंग कीटच्या चाचण्या सुरू

आयुष संजीवनी अॅप्लीकेशनला लॉन्च करण्यात आले आहेत. आयुर्वेदचा वापर करुन संशोधन केले जात आहे. यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. 21 हॉस्पीटल्सला क्लीनिकल ट्रायलसाठी मंजुरी देण्यात आली होती. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (आईसीएमआर)कडून रॅपिड टेस्टिंग कीटच्या तपासण्या सुरू आहेत. 

एका चुकीमुळे सर्वकाही बिघडू शकत

एम्सच्या संचालकांनी सांगितल्यानुसार, जून-जुलैपर्यंत संक्रमण खूप वाढणार आहे. यावर अग्रवाल म्हणाले की, नीट काळजी घेतल्यावर त्या लेव्हलचे संक्रमण होण्यापासून आपण रोखू शकतो. यासाठी सर्वांना मिळून काम करावे लागेल. सर्वात आधी आपल्याला निरीक्षण करावे लागेल. काही हजारांपासून लाखांपर्यंत संक्रमण वाढू नये, यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे. सध्या डबलिंग रेड 10 दिवसांवर आला आहे. ही प्रकरणे कमी होणे सर्वात जास्त गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा देशाला मोठ्या संकटात नेईल.

बातम्या आणखी आहेत...