आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Govt School । Enrollment In Government Schools Rose 7% For The First Time; While Private Music Dropped 9%

कोरोनाचा असाही परिणाम:सरकारी शाळांतील प्रवेश प्रथमच 7% वाढले; तर खासगीत 9% घटले, 62% मुलांनी आर्थिक अडचणींमुळे बदलली शाळा

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांच्या शिक्षणाला संसर्ग 28 राज्यांत 17,184 गावांतील 7,299 शाळांबाबत ‘असर-2021’ चा अहवाल; कोरोनाकाळात वरचढ ठरल्या सरकारी शाळा

कोरोनाने शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. परिणामी प्रथमच सरकारी शाळांत प्रवेश घेणाऱ्या ६ ते १४ वर्षांच्या मुलांची संख्या वाढून २०२१ मध्ये ७०.३% पर्यंत गेली. २०१८ मध्ये ती ६४.३% होती. दुसरीकडे, खासगी शाळांत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटून २४.४% झाली आहे, ती २०१८ मध्ये ३२.५% होती.

या बदलाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आर्थिक समस्या. कारण सर्वाधिक ६२.५% प्रकरणांत पालकांनी पैशाच्या कमतरतेमुळे शाळा बदलली. यूपीच्या सरकारी शाळांत मुलांच्या प्रवेशात सर्वाधिक म्हणजे १३% वाढ झाली. या यादीत केरळ (११.९%) दुसऱ्या, तामिळनाडू (९.६%) तिसऱ्या आणि राजस्थान (९.४%) चौथ्या स्थानी राहिले.

देशातील २५ राज्ये, ५८१ जिल्हे आणि ३ केंद्रशासित प्रदेशातील १७,१८४ गावांतील ७,२९९ शाळांच्या असर (अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट २०२१) सर्व्हेत ही बाब समोर आली आहे. हा सर्व्हे सप्टेंबर-ऑक्टोबर २१ दरम्यान करण्यात आला. अहवालानुसार पहिली आणि दुसऱ्या वर्गातील सुमारे ३६% विद्यार्थ्यांनी अद्याप शाळाच पाहिली नाही.

बदलाची ५ मोठी कारणे
62.4% आर्थिक समस्या
49.1% मोफत सुविधा
40.4% अभ्यास न होणे
15.5% स्थलांतर
5.3% लग्न/रोजगार

२ वर्षांत सरकारी शाळांत सर्वाधिक प्रवेश यूपीत वाढले, फक्त छत्तीसगडमध्ये त्यात झाली घट
राज्य 2018 2020 2021

उत्तर प्रदेश 43.1% 49.7% 56.3%
केरळ 47.9% 60.9% 59.8%
छत्तीसगड 75.7% 67.0% 72.9%

पेड ट्यूशन घेणाऱ्या मुलांच्यी संख्या ४०% पर्यंत गेली

२०१८ मध्ये २८.६% मुले पेड ट्यूशन घेत होते, २०२१ मध्ये हा आकडा ३९.२% पर्यंत पोहोचला. जे आई-वडील कमी शिकले (प्राथमिक शिक्षण किंवा कमी) होते, त्यांच्याद्वारे ट्यूशन लावण्यात १२.६% आणि जे आई-वडील जास्त शिकले होते (९ वीपेक्षा जास्त) त्यांच्यात ७.२% वाढ झाली. ज्या शाळा उघडल्या नाहीत तेथील ४१% मुले आणि ज्या उघडल्या तेथील ३८% मुले ट्यूशन घेत आहेत.

दुप्पट घरांत पोहोचला स्मार्टफोन
२०१८ मध्ये ३६.५% घरांतच स्मार्टफोन होता. २०२१ मध्ये ६७.६% पर्यंत पोहोचला. सरकारी शाळांच्या ६३.७% आणि खासगीच्या ७९% मुलांना स्मार्टफोन उपलब्ध आहे.

अभ्यासात कुटुंबाचे सहकार्य घटले
२०२० मध्ये घरी शिकणाऱ्या तीन चतुर्थांश मुलांना कुटुंबाचे सहकार्य मिळत होते. २०२१ मध्ये ते दोन तृतीयांशच राहिले. इयत्ता ९ वीच्या वरच्या मुलांमध्ये जास्त घट आहे.

राजस्थान ९.६% वाढीसह चौथ्या स्थानी

अनेक खासगी शाळा बंद, त्याचाही परिणाम
११ वर्षे मागे गेल्या खासगी शाळा; दर १०० पैकी ७० मुलांनी घेतला सरकारी शाळांत प्रवेश
पहिली-दुसरीतील दर ३ पैकी एका विद्यार्थ्याने शाळाच पाहिली नाही
नोट : खासगी शाळांऐवजी सरकारीला महत्त्व का दिले जात आहे त्याच्या कारणांवर सर्व्हेत सहभागी शिक्षक आणि प्राध्यापकांनी आपले मत दिले आहे.

खासगी शाळांतील प्रवेश प्रथम २०२० पासून घटले. तेव्हा हे प्रमाण ६ ते १४ या वयोगटात २०१८ च्या ३२.५% वरून घसरून २८.८% वर आले. याआधी २००६ ते २०१४ दरम्यान त्यात सतत वाढ झाली. २०१८ पर्यंत ते ३०% च्या आसपास राहिले. आता हे प्रमाण पुन्हा २०१० च्या स्तराजवळ (२५%) आले आहे. दुसरीकडे, सरकारी शाळांतील प्रवेश २००६ ते २०१८ पर्यंत सतत घटले, नंतर ते ६५% वर स्थिर झाले. २०२१ मध्ये प्रथमच हे प्रमाण ७०% च्या वर गेले.

बातम्या आणखी आहेत...