आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Govt To Buy 125 Kg Of Gold From RBI For Yadadri Temple In Telangana, CM Gives 1 Kg Of Gold

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​तेलंगणमध्ये यदाद्री मंदिराच्या सुवर्णशिखरासाठी 125 किलो सोने आरबीआयकडून खरेदी करणार सरकार, सीएमनी दिले 1 किलो सोने

हैदराबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबादजवळ उभारले जातेय भगवान नरसिंहाचे मंदिर, पुढील वर्षी भाविकांसाठी खुले ​​​​​​​

२०१४ मध्ये आंध्र प्रदेशातून वेगळे झाल्यानंतर तेलंगणात तिरुपतीसारख्या प्रख्यात मंदिराची उणीव भासत होती. त्यामुळे केसीआर सरकार राज्याच्या भुवनगिरी जिल्ह्यात श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचे भव्य यदाद्री मंदिर बांधत आहे. मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याचे शिखर (विमान गोपुरम) सोन्याने मढवले जाणार आहे.

मंदिर बांधकामाचा आढावा घेण्यास आलेले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले,‘मंदिराला १२५ किलो सोन्याची गरज भासणार आहे. त्याची किंमत ६० ते ६५ कोटी रुपये असेल. आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) सोने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. निधी जमा झाल्यानंतर आरबीआयकडून सोने खरेदी केली जाईल. मंदिराचे अधिकारी तिरुमला तिरुपती देवस्थानमधील तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत.’

मुख्यमंत्र्यांनी स्वत: प्रथम देणगीदार म्हणून एक किलो १६ तोळे सोने दान केले. त्यानंतर टीआरएसच्या अनेक आमदारांनी व उद्योगपतींनी दान देण्याची घोषणा केली आहे. राज्याचे कामगारमंत्री १ किलो आणि त्यांच्या मतदारसंघातील लोक १ किलो सोने देतील. नागरकुनरूलचे आमदार रेड्डी २ किलो सोने दान देतील. प्रख्यात ज्योतिषी चिन्ना जीयर स्वामी यांनीही आपल्या पीठातून १ किलो सोने दान दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरासाठी सामान्य लोक आणि संघटनांकडून देणगी घेतली जाईल. किमान ११ हजार रुपयांची देणगीही स्वीकारली जाईल.

नरसिंह हा भगवान विष्णूंचा चौथा अवतार मानला जातो. मंदिर त्यांनाच समर्पित आहे. मंदिरात ३९ किलो सोन्याने आणि १,७५३ टन चांदीने सर्व गोपुरे (दारे) आणि भिंती मढवल्या जातील. त्यासाठी ७०० कोटी रुपये लागतील. मंदिराचे डिझाइन प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे कला दिग्दर्शक आनंद साईंनी तयार केले आहे. तेथे रोज १० हजार भाविकांच्या भोजनाची व्यवस्था असेल. मंदिराजवळ २५० एकरांत टेम्पल सिटीही तयार होत आहे. तीत २०० एकरांत २०० कॉटेज, ५० एकरांत हिरवळ असेल.

२०१६ मध्ये कामाचा प्रारंभ, लॉकडाऊनमध्येही सुरूच; खर्च १८०० कोटी रु
हैदराबादपासून ६० किमी दूर पहाडावरील यदाद्री मंदिराचे काम २०१६ मध्ये सुरू झाले होते. त्याचे काम लॉकडाऊनदरम्यानही सुरूच होते. मंदिर २८ मार्च २०२२ रोजी भाविकांसाठी खुले होईल. त्याआधी २१ मार्चला चिन्ना जीयर स्वामींच्या नेतृत्वात १,००० पुरोहितांसह सुदर्शन यज्ञ होईल. देशभरातील ४,००० प्रमुख पुजाऱ्यांसह ६,००० पुरोहितही यज्ञात सहभागी होतील.

बातम्या आणखी आहेत...