आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Himachal Python Found; People Grabbed Python And Hugged | Wildlife News | Video | Himachal News

रस्त्यावर रेंगाळत होते 3 अजगर VIDEO:एकाची लांबी 13, दुसऱ्याची 9 आणि तिसऱ्याची 7 फूट; लोकांनी काढले फोटो

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साप, नाग यासंह सरपटणारे प्राणी शेतात किंवा डोंगरभागात दिसून येणं ही नवी गोष्ट नाही. मात्र, अजगर आढळून आल्यास सर्वत्र याची चर्चा होते. कांगडा जिल्ह्याच्या सीमेवरील गंदाड या गावात अनेकांना गावालगत रस्त्यावर 3 महाकाय अजगर सतत दिसून आले. गावात गेल्या काही दिवसांपासून अजगराची दहशत पसरली होती. अखेर या 3 अजगरांना पकडण्यात अखेर यश आले आहे.

3 महाकाय अजगर हे रस्त्यावर एकत्र रेंगाळत होते. एकाची लांबी 13 फूट, दुसऱ्याची 7 आणि तिसऱ्याची सुमारे 3 फूट आहे. स्नेक मॅन, स्नेक सेव्हर म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथुर धीमानला यांनी तिन्ही अजगरांना पकडून जंगलात सोडले. तीन अजगर रस्त्यावर दिसून आल्याने गंदाड गावातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

3 महाकाय अजगरांची गावात भीती पसरल्याची माहिती मिळाल्यानंतर वेळ न गमावता माथुर धीमान यांनीही उपरेंजर मनजीतसिंग राणा यांच्यासह गाव गाठले. यावेळी तिन्ही अजगर एकाच ठिकाणी दिसले. मात्र लोकांना पाहताच तिघेही एका बुडात घुसले. यानंतर तिघांनाही पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

माथुर धीमान यांनी पकडलेला दुसरा अजगर.
माथुर धीमान यांनी पकडलेला दुसरा अजगर.

माथुर धीमान यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिन्ही अजगरांना बिळातून बाहेर काढण्यात यश मिळवले आणि त्यांना पकडूनलोकवस्तीपासून दूर जंगलात सोडले. धीमान यांनी सांगितले की, तिन्ही अजगर खूप शक्तिशाली होते. एक 7 फूट, दुसरा 9 फूट आणि तिसरा सर्वात लांब 13 फूट होता. हे तिघेही विषारी नव्हते, पण ते रॉक अजगर प्रजातीचे होते.

पुढे ते म्हणाले की, अजगर कोल्हा, माकड, कुत्रा इत्यादी वन्य प्राण्यांची शिकार करतो. ते आपल्या शिकाराला त्यांच्या स्नायूंनी पकडतात. त्यानंतर ते आपली शिकार जिवंत गिळतात. जर एखादा बलाढ्य माणूसही त्यांच्या पकडीत आला तर ते त्याचीही शिकार करू शकतात. अशा स्थितीत अजगर दिसताच पळून जावे.

माथुर धीमान यांनी पकडलेला तिसरा अजगर.
माथुर धीमान यांनी पकडलेला तिसरा अजगर.

गेल्या 20 दिवसांपासून या रस्त्यावर 3 मोठे अजगर दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. ग्रामस्थ अनेकदा या मार्गाचा वापर करतात. भीती इतकी होती की अनेकांनी त्या वाटेकडे जाणेच सोडून दिले होते. गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. गावकऱ्यांना सर्वात मोठी चिंता लहान मुलांची होती. मुख्य रस्ता असल्याने भीतीच्या छायेत लोक सावधपणे राहत होते. शनिवारी सायंकाळी अजगर रस्त्यावर दिसू लागताच याची माहिती तात्काळ माथूर धिमान यांना देण्यात आली.

महिलेला अजगराने जिवंत गिळले

एका महाकाय अजगराने 54 वर्षीय महिलेला जिवंत गिळल्याची घटना समोर आली आहे. यानंतर या अजगराला चिरून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रबर काढण्यासाठी जंगलात गेलेल्या या महिलेवर अजगराने हल्ला करत तिला गिळले होते. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...