आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Grants Given To Students To Improve Their School Performance; News And Live Updates

पडताळणी:आपल्या शाळेची कामगिरी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना भरभरून दिले गुण; काही शाळांच्या खोडीमुळे अडकला सीबीएसई 10 वी बोर्डाचा निकाल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • बोर्डाचे 17 पर्यंत पुन्हा गुण अपलोड करण्याचे निर्देश

सीबीएसईच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) १० वी व १२ वीच्या निकालास होणाऱ्या उशिराचे कारण उघड झाले आहे. काही शाळांच्या खोडीचे परिणाम देशभरातील शाळांना भोगावे लागत आहेत. या शाळांनी आपल्या शाळेची कामगिरी सुधारण्यासाठी टेब्युलेशन फॉर्म्युल्याच्या रेफरन्स रेंजचा आपल्या पद्धतीने वापर करत विद्यार्थ्यांना जास्त गुण दिले. गुण अपलोड झाल्यानंतर डेटा विश्लेषण करताना ही खोडी लक्षात आली. या शाळांची मूल्यांकन प्रक्रियाच सीबीएसईने फेटाळली आहे.

आता १७ जुलैपर्यंतचा वेळ देऊन बोर्डाने स्पष्ट केले की टेब्युलेशन निर्देशातील शब्द आणि भावना व्यवस्थित लागू करा, नाही तर यात बोर्ड स्वत: हस्तक्षेप करत गुणदान करेल. सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की बोर्डाने आता १० वीचे निकाल २० जुलै आणि १२ वीचे निकाल ३० जुलै रोजी घोषित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जर बोर्डाला शुक्रवारपर्यंत शाळांकडून डेटा मिळाला तरच निर्धारित तारंखाना निकाल दिला जाईल.

इंटरनल अॅसेसमेंट-थेअरी मिळून ९६ पेक्षा जास्त गुण दिल्यास पुनरावलोकन करू
बोर्डाने एक परिपत्रक पाठवून सांगितले की, काही शाळांनी थेअरी गुणांत ७०-८० अंकाच्या ब्रॅकेटचा लाभ घेत जास्तीत जास्त ७७-८० चे मानक स्वीकारले. बोर्डाने डिफॉल्टर शाळांना म्हटले की, ज्या विद्यार्थ्यांना इंटरनल अॅसेसमेंट आणि थेअरी मिळून ९६ किंवा अधिक गुण दिले आहेत, त्यांचे पुनर्विलोकन केले जावे. केवळ डिफाॅल्टर शाळांचे खातेच गुण अपलोड करण्यासाठी १७ जुलैपर्यंत उघडण्यात आले. निर्देशांचे पालन न झाल्यास स्वत: बोर्ड त्या शाळांच्या गुणांचे मॉडेरटिंग करेल.

बातम्या आणखी आहेत...