आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Greater Hyderabad Municipal Election Counting Live News And Updates, Counting Of Votes In 150 Seats Of Hyderabad Municipal Corporation Continues

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैदराबादच्या रेसमध्ये TRS आघाडीवर:महापालिका निवडणुकीत भाजप 47 जागांवर विजयी, तर 2 ठिकाणी आघाडीवर

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2016 हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपल्या मिळाल्या होत्या केवळ 3 जागा

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता 150 जागांचा कल येण्यास सुरुवात झाली. थोड्याच वेळात भाजप सर्वाधिक जागांवर असल्याचे दिसून आले. एका वेळी त्यांना 79 जागांवर आघाडी मिळाली होती. मागील निवडणुकीत आघाडीवर असणारा सर्वात मोठा पक्ष तेलंगाना राष्ट्रवादी समिती (TRS) 35 वर दिसत होता. पण, 5 तासात म्हणजेच एक वाजेदरम्यान बाजी पलटली आहे आणि टीआरएस आघाडीवर आले आहे.

आता भाजपचा 47 जागांवर विजय झाला असून, 2 ठिकाणी आघाडीवर आहे. TRS रेसमध्ये पुढे आहे. त्यांना 55 जागांवर विजय मिळाला आहे. यासोबतच असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM ला 43 ठिकाणी विजय मिळाला आहे.

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एकूण 150 जागांसाठी तब्बल 1,122 उमेदवार मैदानात होते. भाजपने या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2016 मध्ये झालेल्या ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपला केवळ 3 जागा मिळवता आल्या होत्या. तर काँग्रेसला सुद्धा केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. टीआरएसला सर्वाधिक 99 आणि एमआयएमला 44 जागांवर विजय मिळाला होता. ग्रेटर हैदराबाद आणि ओल्ड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद भागात प्रामुख्याने एमआयएम आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा डंका असतो.

भाजपकडून अमित शहांनी सांभाळला होता मोर्चा
हैदराबादच्या स्थानिक निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी घेतली होती. 29 नोव्हेंबर रोजी त्यांनी हैदराबादचा दौरा केला आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सिकंदराबाद येथे रोड शो केला होता. मग, पत्रकार परिषदेत त्यांनी टीआरएस आणि एमआयएमवर हल्लाबोल केला होता. टीआरएसने एमआयएमशी तडजोड करून बंद खोलीत ईलू-ईलू करत जागा वाटल्या होत्या असा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser