आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Greater Noida Coronavirus Latest News | Doctors Perform Last Rites Of Corona Postive Instead Of His Son In Uttar Pradesh City Greater Noida

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची भीती:पतीच्या निधनानंतर महिलेने एकुलत्या एक मुलाला खांदा देण्यास रोखले, म्हणाली याला देखील कोरोना होईल; डॉक्टरांनी निभावला मानवतेचा धर्म

ग्रेटर नोएडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुटुंबातील लोकांनी देखील दफनभूमीत पोहचल्यानंतर प्रेताला हात लावण्यास दिला होता नकार

कोरोना व्हायरच्या संकटकाळात रक्ताचे नाते देखील परके होत आहेत. शनिवारी रात्री ग्रेटर नोएडामध्ये याचे उदाहरण पाहायला मिळाले. येथे एका आईने आपल्या एकुलत्या एक मुलाला त्याच्या कोरोना पॉझिटिव्ह वडिलांचे अंतिम क्रियाकर्म करण्यापासून रोखले. इतकेच नाही तर त्यांच्या धर्मातील लोकांनी देखील त्याला क्रियाकर्म करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार कसे केले जातील असा प्रश्न लोकांना पडला. अखेर पोलिसांच्या मदतीने आरोग्य कर्मचार्‍यांनी खबरदारी घेत मृतदेहाचे सुपुर्द-ए-खाक केले.     

या दोन डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी निभावला मानवतेचा धर्म

कुटुंबातील सदस्यांनी नकार दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतदेहाला दफन करण्याची जबाबदारी जिल्हा क्वारंटाइन प्रभारी आणि एसीएमओ डॉ.व्हीबी ढाका, दादरी सीएचसी प्रभारी डॉ. अमित चौधरी आणि फार्मासिस्ट कपिल चौधरी यांच्यावर सोपवली. मृताच्या कुटुंबियांना सोबत घेऊन त्यांच्या धर्मानुसार क्रियाकर्म करण्यास मदत करण्याचे त्यांना निर्देश दिले. रात्री दहाच्या सुमारास वृद्ध व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातून नोएडाच्या काकरळा गावात स्मशानभूमीत नेण्यात आला. त्याचवेळी मृताची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनाही गॅलगोटिया युनिव्हर्सिटी क्वारंटाइन सेंटरमधून स्मशानभूमीत आणण्यात आले.

महिला म्हणाली- कोरोनाने पतीला हिसकावले आता मुलाला गमावयचे नाही 

कबर खोदल्यानंतर रुग्णवाहिकेत बसलेले मृताची पत्नी, मुलगा आणि मुलीला प्रेत शवगाडीतून काढून सुपुर्द-ए-खाकची कार्यवाही पूर्ण करण्यास सांगतले. मात्र पतीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या पत्नीने कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या मुलगा व मुलीला अंतिमक्षणी वडिलांना स्पर्श करण्यापासून रोखले. ती म्हणाली की कोविड -19 ने तिच्या पतीचा जीव घेतला, आता तिला मुलांना गमवायचे नाही. 

मुलगा म्हणाला - आईच्या अश्रूंनी रोखले 

मुलाच्या म्हणण्यानुसार, वडिलांच्या अंतिम वेळी त्याला त्याचे कर्तव्य बजावायचे होते. पण, आईच्या डोळ्यातील अश्रूंनी त्याला रोखले. यामुळे, केवळ दोन डॉक्टर आणि फार्मासिस्टने कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्या वडिलांचे क्रियाकर्म पूर्ण केले. 

बातम्या आणखी आहेत...