आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुलवामाच्या गदुरा भागात अतिरेक्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यात बिहारच्या एका मजुराचा मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले. जम्मू काश्मीर पोलिसांनी या परिसराला घेराव घातला आहे. मोहम्मद मुमताज असे मृताचे नाव आहे. मोहम्मद आरिफ व मोहम्मद मजबूल हे पितापुत्र या हल्ल्यात जखमी झालेत. हे सर्वजण बिहारचे रहिवासी आहेत.
टेंट हाऊसमध्ये करत होते काम
अतिरेक्यांनी ज्या मजुरांवर हल्ला केला, ते गदुरा गावच्या एका टेंट हाऊसमध्ये काम करत होते. हल्ल्यावेळी ते सूती चादर बनवत होते. मागील 2 महिन्यांपासून खोऱ्यात अतिरेक्यांचे एन्काउंटर सुरू आहे. त्यामुळे टार्गेट किलिंगच्या घटनांत घट झाली होती. पण गुरूवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे अतिरेकी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गत बुधवारी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या अलोचीबाग धरण भागात अतिरेक्यांनी पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला होता. पण त्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते.
एप्रिलमध्ये झाला होता मजुरांवर हल्ला
यापूर्वी एप्रिल महिन्यात अतिरेक्यांनी पुलवामा जिल्ह्यातील लाजूरात बिहारच्याच 2 जणांवर गोळीबार केला होता. त्यात दोघेही मजूर जखमी झाले होते. जोखू चौधरी व पत्लेश्वर चौधरी अशी त्यांची नावे होती. तेही बापलेक होते.
कलम -370 रद्द केल्यामुळे हल्ला
जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या घटनेला शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी 3 वर्ष पूर्ण झालेत. त्यामुळे या हल्ल्यांचा संबंध या घटनेशी जोडला जात आहे. दुसरीकडे, आयबीने आपल्या अहवालात जैश ए मोहम्मद व लष्कर ए तोयबा सारख्या अतिरेकी संघटना एका मोठ्या हल्ल्याचा कट आखत असल्याचा दावा केला आहे.
गुप्तहेर विभागाने 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक अलर्ट जारी केला होता. तसेच दिल्ली पोलिसांना 10 पानी अहवालही सोपवला. या अहवालात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अतिरेकी हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.