आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Greta Thunberg On Oxygen Crisis In India | Cimate Activist Greta Thunberg Comment On India Covid Situation And Lack Of Oxygen; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात ऑक्सिजनची कमतरता:ग्रेटा थनबर्ग म्हणाली - भारताची परिस्थिती दयनीय, जगाने मदत केली पाहिजे; शेतकरी आंदोलनामुळे आली होती चर्चेत

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • शेतकरी आंदोलनामुळे आली होती वादात

भारतात सध्या कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वीडन येथील हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ट्व‍िट करत भारत देशातील ऑक्सिजन कमरतेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, 'भारत देश सध्या कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेतून जात आहे. यामुळे देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आदींची कमतरता भासत आहे. त्यामुळे जगाने पुढाकार घेत कोरोनाच्या लढाईत संघर्ष करणार्‍या भारत देशाला मदत केली पाहिजे.' असे आवाहन तीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला केले.

शेतकरी आंदोलनामुळे आली होती वादात
ग्रेटा थनबर्गने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भांत एक टूलकिट शेअर केले होते. त्यामुळे ती वादात सापडली होती. दरम्यान, तीला भारतात खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. तीच्यावर भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याच्या गटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला होता.

म्यूटंट व्हेरिएंटमुळे वाढत आहे प्रकरणे
भारतातील परिस्थितीबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की, देशात म्यूटंट व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, कोरोनाच्या नियमांकडे लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ही ते म्हणाले. देशात दररोज कोरोनाचे 3 लाखांवर रुग्ण आढळून येत असून यामुळे ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आदींची कमतरता भासत आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे :3.48 लाख
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :2,761
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :2.15 लाख
 • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :1.69 कोटी
 • आतापर्यंत बरे झाले :1.40 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू :1.92 लाख
 • सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :26.74 लाख
बातम्या आणखी आहेत...