आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Greta Thunberg Toolkit Case: Delhi Police Team Reaches Mumbai To Arrest Accused Nikita Jacob, Raids Continue For Vine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रेटा थनबर्ग टूलकिट केस:आरोपी निकिता जेकबला अटक करण्यासाठी मुंबईत पोहोचले दिल्ली पोलिस, छापेमारी सुरू; जामिनासाठी हायकोर्टात निकिताची याचिका

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंतरिम जामिनासाठी निकिताने उच्च न्यायालयात धाव घेतली

ग्रेटा थनबर्ग टूलकिट केसमध्ये दिल्ली पोलिसांची एक टीम मुंबई हायकोर्टात वकील निकिता जेकब यांच्या शोधात सोमवारी मुंबईत पोहोचली. निकिता यांना फरार घोषित करत दिल्ली पोलिसांनी अजामिनपात्र वारंट जारी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने निकिताच्या घर आणि नातेवाईकांचीही झडती घेतली आहे, परंतु अद्याप कोणताही पुरावा मिळू शकला नाही. निकिता जेकब टूलकिट केसमध्ये अटक केलेल्या बंगळुरूच्या 22 वर्षांच्या दिशा रवीची निकटवर्तीय आहे.

अंतरिम जामिनासाठी निकिताने उच्च न्यायालयात धाव घेतली
दिल्ली पोलिस निकिताशिवाय शंतनू नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. शंतनू हा महाराष्ट्रातील बीडचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे की हे दोघेही टूलकिट प्रकरणात सामील आहेत. अजामीनपात्र वॉरंट आणि अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वकील निकिता जेकब यांनी याचिका दाखल केली असून, त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

निकितावर हा आहे आरोप
या प्रकरणातील अटक केलेल्या दिशाच्या सांगण्यावरुन टूलकिट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्याचा आरोप आहे निकिता यांच्यावर आहे. दिशाला अटक केल्यानंतर दिल्ली न्यायालयाच्या आदेशानुसार तिला 5 दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. स्वीडनच्या कार्यकर्त्या ग्रेटा यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवून ट्विट केले आणि हे टूलकिट शेअर केले. यावर भारत सरकारने आक्षेप घेतला यानंतर ट्विटरने हे ट्विट हटवले. यानंतर दिल्ली पोलिसांनी अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला.

दिशानेच टूलकिट ग्रेटासोबत शेअर केला होता
दिल्ली पोलिसांनी रविवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला दिशाला अटक केली. दिशा देखील क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट आहे. दिल्ली पोलिसांनुसार, फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेन सुरू करणाऱ्यांमध्ये सामिल दिशाने टूलकिटचा गूगल डॉक बनवून सर्कुलेट केला. यासाठी तिने व्हॉट्सअपवर ग्रुप बनवला. ती या टूलकिटच्या ड्राफ्टिंगमध्येही सामिल होती.

बातम्या आणखी आहेत...