आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ग्रेटा थनबर्ग टूलकीट प्रकरणात आरोपी निकीता जेकबला मुंबई उच्च न्यायालयाने 3 आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुनाणीदरम्यान न्यायाधीश पीडी नाईक यांनी सांगितले की, या तीन आठवड्यांमध्ये निकीताला आपल्यावर खटल्याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात जाता येऊ शकते. निकीता ही व्यवसायाने वकील आहे.
निकीताला दिल्ली पोलिसांनी 15 फेब्रुवारी रोजी फरार घोषीत करत, अजामीणपात्र वॉरंट जारी केला होता. यानंतर संबंधित प्रकरणातील अजामीणपात्र वॉरंट रद्द करत अंतरिम जामीन मिळण्यासाठी निकीताने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निकीताला अटक झाल्यास वैयक्तिक 25 हजार रुपये आणि एवढीच जामीन रक्कम भरल्यावर सोडण्यात येणार आहे.
निकीता ही दिशा रावीच्या संपर्कात
निकीता ही टूलकीट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगळुरू येथील पर्यावरणवादी आंदोलक(क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट) दिशा रावीच्या संपर्कात असून निकीताला पकडण्यासाठी दिल्ली पुलिस काही दिवसांपासून मुंबईत आहे. दिल्ली पोलिसांनी एक वेळ निकीताची चौकशी करत तिच्या नातेवाईकांचीसुद्धा चौकशी केली आहे. पण दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले असता ती हजर राहिली नाही.
या प्रकरणानंतर तिने आपले सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते. दावा करण्यात येत आहे की, त्यावेशेस तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:चा परिचय मुंबई उच्च न्यायालयाची वकील, पर्यावरण कार्यकर्ता आणि आम आदमी पार्टीसोबत असल्याचा दिला होता. पण नवीन प्रोफाईलमध्ये तीने आपचा उल्लेख केला नाही.
निकातावर हे आरोप आहेत
निकीतावर आरोप आहेत की तीने दिशा रावीच्या सांगण्यावरुन आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टूलकीट शेअर केले होते. दिशाला अटक केल्यानंतर दिल्ली न्यायालयाच्या आदेशावरुन तिला 5 दिवसांच्या पोलिस कस्टडीत पाठवण्यात आले होते. स्वीडन येथील पर्यावरण आंदोलनकर्ती ग्रेटा थनबर्गनेसुद्धा शेतकरी आंदोलनच्या समर्थनार्थ हे टूलकीट शेअर केले होते. यावर केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने त्या पोस्ट हटविल्या होत्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.