आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Greta Thunberg Toolkit Case Kisan Andolan Update; Activist Disha Ravi, Nikita Jacob, Shantanu Muluk

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टूलकिट प्रकरण:न्यायालयाने क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला पाठवले एक दिवसाच्या रिमांडवर, निकिता आणि शांतनुसमोर होईल चौकशी

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जामीन अर्जावर उद्या सुनावणी

शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणात क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला चीफ मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेटने एका दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. परंतु, दिल्ली पोलिसांनी पाच दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. शुक्रवारी दिशाची रिमांड 3 दिवसांसाठी वाढवली होती, जी आज पूर्ण होणार होती. या प्रकरणातील सह-आरोपी निकिता जेकब आणि शांतनु मुलुकची सायबर सेलमध्ये चौकशी होत आहे.

पोलिस दिशा, शांतनु आणि निकिताला समोरा-समोर बसवून चौकशी करेल. याचे कारण पोलिसांनी सांगितले की, दिशाने सर्व आरोप शांतनु आणि निकितावर टाकले आहेत.

जामीन अर्जावर उद्या सुनावणी

दिल्लीच्या पतियाळा हाउस कोर्टात दिशाच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल. मागच्या सुनावणीदरम्यान पोलिस कोर्टाला म्हणाले होते, भारताला बदनाम करण्याच्या ग्लोबल कटात दिशा सामील आहे. तिने शेतकरी आंदोलनाच्या आड लपुन देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता. दिशाने फक्त टूलकिट बनवून शेअर केली नाही, तर तिने खलिस्तानशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली. खालिस्तानी संघटनेने दिशाचा वापर केला. परंतु, दिशाच्या वकिलाने या आरोपांचे खंडन केले.

बातम्या आणखी आहेत...