आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Grocery Stores, Out of town Factories Likely To Start From April 20 In The Lock Down 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:किराणा दुकाने, शहराबाहेरील कारखाने 20 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता; महामार्गावरील ढाबे सुरू होणार, मात्र रेस्टॉरंट, हॉटेल बंदच राहणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • हॉटस्पॉट नसलेल्या भागासाठी लॉकडाऊन-२ मधील सूटबाबतचे निर्देश जारी
 • शाळा, मॉल बंदच राहणार; इलेक्ट्रिशियन, प्लंबर यासारख्या सुविधा सुरू होणार
 • फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, दारूच्या दुकानांवरील बंदी कायम राहणार

केंद्र सरकारने २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये मिळणाऱ्या सवलतींबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत. ठप्प असलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी २० एप्रिलपासून बिनशहरी क्षेत्रातील उद्योग पुन्हा सुरू करण्यात येतील. तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार निर्माण करण्यासाठी मनरेगा आणि इतर कामे सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन आणि प्लंबरसारख्या सुविधा व्यवस्थापन सेवांना ही कामाची परवानगी राहील. मात्र, ज्या भागात संसर्ग नाही त्याच भागात या सवलती राहतील. सूटनंतरही एखादा भाग कंटेनमेंट झोनमध्ये समाविष्ट झाला तर तत्काळ या सवलती मागे घेण्यात येतील. 

राज्यांनी हे निर्देश शिथिल करू नयेत, कडक करता येतील : केंद्र.............

आवश्यक वस्तू : किराणा दुकाने सुरू-बंद करण्याच्या वेळांवर निर्बंध नसतील 

 • जीवनाव‌श्यक वस्तू पुर‌वठासंबंधी सर्व सुविधा कार्यरत राहतील. मॅन्युफॅक्चरिंग, घाऊक तसेच स्थानिक दुकानांद्वारे किरकोळ विक्रीशी संबंधित सर्वांचा यात समावेश राहील. {वाहने आणि ई-कॉमर्स कंपन्यांनाही कामाची परवानगी राहील.
 • किराणा,जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, अन्नधान्याची दुकाने, हायजीन उत्पादने, फ‌ळे व भाजीपाला, डेअरी, दूध केंद्रे, पोल्ट्री, मांस-मासळीशी संबंधित दुकाने सुरू राहतील.
 • प्लंबर, इलेक्ट्रिशियनसारख्या सुविधा सुरू होतील.

निर्मिती : मनरेगाशिवाय रस्ते, सिंचन प्रकल्पांचे काम सुरु होण्याची शक्यता 

 • ग्रामीण भागात रस्ते, सिंचन प्रकल्प, इमारती आणि एमएसएमईसह सर्व प्रकारचे औद्योगिक प्रकल्पात निर्मिती सुरू होईल.औद्योगिक भागात सर्व प्रकारच्या उद्योगांना उत्पादनाची मुभा राहील.अक्षय्य ऊर्जेशी संबंधित प्रकल्पांत काम सुरू होईल.
 • शहरात मजूर उपलब्ध आहेत तेथ,त्यांना बाहेरुन आणावे लागणार नाही तेथे काम सुरू करता येईल.
 • सोशल डिस्टन्सिंगचे कडक पालन आणि मास्कसह मनरेगाचे काम सुरू होइल. यात सिंचन आणि जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य राहील. केंद्राच्या अन्य योजनाचेही काम करता येईल.

अर्थ :  कृषी नंतर सर्वाधिक रोजगार देणारे निर्मिती हे क्षेत्र आहे. देशातील सुमारे १३% रोजगार या क्षेत्रात आहे. यामुळे ६.६ कोटी लोकांना पुन्हा रोजगार मिळेल. त्याशिवाय मनरेगात ११ कोटी नोंदणीकृत मजूर आहेत. त्यांना थेट लाभ होईल. 

उद्योग : कामगारांना कारखान्यातच राहण्याची, ने-आण करण्याची व्यवस्था करावी लागेल

 • नागरी हद्दीबाहेरील किंवा ग्रामीण भागातील उद्योगांना काम सुरू होईल. अॅक्सेस कंट्रोलसह एसईझेड, औद्योगिक क्षेत्रे, इंडस्ट्रियल टाऊनशिपमध्ये उत्पादनाची परवानगी राहील. बाहेरून कामगार आणायचे असतील तर वाहनांची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी स्थानिक प्रशासन पास जारी करतील. कार्यस्थळी सॅनिटायझेशनची सोय करावी लागेल.

शेती/ गाव : बाजार, कृषी अवजारे, खतांशी संबंधित दुकाने सुरू ठेवता येणार 

 • कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालनाशी संबंधित सर्व व्यवहार पूर्णत: सुरू राहतील. शेतकरी, मजुरांना शेतात कामे करता येतील. {कृषी उत्पादने खरेदीशी संबंधित संस्थांना सूट. बाजार सुरू राहतील.{ कृषी अवजारे, सुटे भाग आणि त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सुरू होतील. संबंधित कस्टम हायरिंग केंद्रे ही सुरू राहतील.

अर्थ : कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत एकूण २७ कोटी लोकांना रोजगार मिळतो आहे. मात्र, या २७ कोटी लोकांवर ६० कोटींहून जास्त लोक अवलंबून आहेत. 

आरोग्यसेवा : पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील

 • रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, टेलिमेडिसीन सारख्या सुविधा सुरू राहतील. {डिस्पेन्सरी, केमिस्ट, फार्मसी, जन औषधी केंद्र, चिकित्सा संबंधी उपकरणांसह प्रत्येक औषधाचे दुकान सुरू राहील.
 • आ‌वश्यक सेवा: बँका पूर्णवेळ सुरू राहतील, टेलिकॉम-इंटरनेट कंपन्यांचे काम सुरू होईल
 • बँका आणि एटीएम सुरू राहतील. सरकारकडून खात्यात टाकलेल्या रकमेचे वितरण पूर्ण होईपर्यंत बँका पूर्णवेळ काम करतील. बँकिंग करस्पाँडंट्स आणि एटीएमसंबंधी कंपन्यांना सूट मिळेल.
 • पेट्रोल, डिझेल, रॉकेल, सीएनजी, एलपीजी आणि पीएनजीचा पुरवठा सुरूच राहील.
 • आयटी आणि त्याच्याशी संबंधित सेवांना ५०%कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी राहील.
 • ई-कॉमर्स कंपन्या, त्यांची वाहने यांना सूट मिळेल. कुरिअर सेवाही सुरू होतील.

मालवाहतूक :  आ‌वश्यकच नव्हे तर सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक शक्य

 • सर्व प्रकारच्या मालाच्या वाहतुकीस परवानगी. मालगाड्या आणि पार्सल रेल्वे धावतील. कार्गो व्यवहार, मदत आणि बचावसंबंधी विमान वाहतूक सुरू राहील. महामार्गावरील ट्रक दुरुस्तीची दुकाने, ढाबेही सुरू राहतील.

सरकारी कार्यालये : उपसचिव आणि उच्चपदस्थांना कार्यालयात यावे लागेल

दिशानिर्देशांनुसार, केंद्रीय मंत्रालयांत उपसचिव आणि त्यापेक्षा उच्चपदस्थ अधिकारी कार्यालयात येतील. उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी ३३% कामावर येतील. राज्ये आपल्या सोयीनुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत निर्णय घेतील.

३ मेपर्यंत हे सर्व बंदच राहणार...याबाबत नंतरच्या काळात निर्देश दिले जातील

 • शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, जिम, स्पोर्ट‌्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम, असेम्ब्ली हॉल, क्लब इत्यादी.
 • सर्व प्रकारच्या रेल्वे, बस, टॅक्सी, रिक्षा.
 • सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे.
 • सर्व शाळा, कॉलेज, विद्यापीठे, कोचिंग क्लासेस.
 • रुग्णालये. लोक अडकून असतील तेथेच हॉटेल उघडतील.
 • सामाजिक, राजकीय, धार्मिक समारंभ होणार नाहीत.
 • सामान्य लोकांसाठी देशभरातील सर्व प्रकारची धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे बंद राहतील.
 • कोणतीही व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकणार नाही.
बातम्या आणखी आहेत...