आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठवणीवेळी वर म्हणाला - कौमार्य चाचणी करा:बिहारमध्ये वराची डिमांड ऐकताच वधूने त्याच्यासोबत जाण्यास दिला नकार

मोतीहारी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यात एका लग्नात मोठा वाद झाला. वधू पक्षाने वर, त्याचे वडील व 2 मेहुण्यांना ओलीस ठेवले. त्याचे झाले असे की, वराने पाठवणीवेळी वधूची कौमार्य चाचणी करण्याची मागणी केली. त्याची ही विचित्र मागणी ऐकून वधू पक्षाचा पारा चढला. त्यांनी थेट वर पक्षाच्या लोकांना सलग 2 दिवस ओलीस ठेवले. त्यानंतर पोलिस व स्थानिकांच्या मदतीने त्यांची सुटका झाली. पण वधूने वरासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला.

ही घटना तुरकौलिया ठाण्याच्या चारगाहाची आहे. तिथे 16 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय गुदरी बैठाच्या मुलीचे बेतियाच्या अहवर शेख गावातील निर्मल बैठाचा मुलगा सूरजशी झाले होते. दुसऱ्या दिवशी पाठवणीवेळी दोन्ही पक्षांत वाद झाला. त्यानंतर वराने वधूची कौमार्य चाचणी करण्याची मागणी केली.

नातेवाईकांची मुलीच्या सुरक्षेची मागणी

16 नोव्हेंबर रोजी बँडबाजासह वऱ्हाडी बेतियाहून चारगाहाला पोहोचले. तिथे धूमधडाक्यात लग्न झाले. पण गुरुवारी सकाळी पाठवणीवेळी वर व वधू पक्षात कोणत्या तरी मुद्यावरून वाद झाला. मुलीला सासरघरी कोणताही त्रास होणार नाही याची लेखी हमी वधू पक्षाने मागितल्याचा आरोप वर पक्षाने केला.

वराने व्हर्जिनिटी टेस्टची मागणी केल्यानंतर वधू पक्षाने त्यांना ओलीस ठेवले.
वराने व्हर्जिनिटी टेस्टची मागणी केल्यानंतर वधू पक्षाने त्यांना ओलीस ठेवले.

वर म्हणाला - कौमार्य चाचणीनंतरच होईल पाठवणी

यामुळे वर नाराज झाला. त्याने थेट वधूची कौमार्य चाचणी करण्याची मागणी केली. त्याच्या या मागणीने स्थानिक संतप्त झाले. दोन्ही पक्षांत धक्काबुक्की झाली. मुलीने वर मद्यपी असल्याचा आरोप केला. यामुळे तिची पाठवणी झाली नाही.

2 दिवसांपर्यंत ओलीस ठेवले

व्हर्जिनिटी टेस्टच्या मागणीमुळे संतप्त झालेल्या वधू पक्षाने वर व त्याच्या नातेवाईकांना ओलीस ठेवले. त्यांनी वरासह त्याचे वडील व 2 मेहुण्यांना बंधक बनवले. त्यांना सलग 2 दिवस आपल्याकडे ओलीस ठेवले.

या काळात पंचायतींची बैठक झाली. तरुकौलियाचे ठाणे अंमलदार मिथिलेश कुमार, स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने प्रकरणाचा निपटारा केला. 18 नोव्हेंबर रोजी मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. दुसरीकडे, वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला. यामुळे नवरदेवावर नवरीशिवाय लग्न मंडपातून काढता पाय घेण्याची वेळ आली.

बातम्या आणखी आहेत...