आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देवभूमी उत्तराखंडमध्ये साडेसात वर्षानंतर पुन्हा निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. चमोली जिल्ह्यातील रैणी गाव, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणचा आम्ही तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट देत आहोत. या ठिकाणी हिमनग तुटल्यामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. चामोली येथील शासकीय पीजी महाविद्यालय, परीक्षा नियंत्रक डॉ.अखिलेश कुकरेती यांनी भास्करसाठी हा रिपोर्ट दिला आहे...
हिमकडा कोसळला, पाहता पाहता संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले
तपोवनच्या रैणी गावाजवळ सकाळी सुमारे साडेदहा वाजता हिमकडा तुटून ऋषिगंगा नदीत कोसळला. या नदीकाठी ऋषिगंगा वीज प्रकल्पाचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या टोकाला रैणी गाव आहे. या गावाला आजूबाजूला रैनी चाक, लता, सुभाई, जुगाजुक्लता ही गावे आहेत.
या गावांमध्ये सुमारे दोन हजार लोक राहतात. हिमकडा तुटल्यामुळे सर्वात आधी ऋषिगंगा नदीची पाणी पातळी वाढली. पाहता पाहता संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले. रैणी गावातही पाणी शिरले, मात्र त्याची पातळी जास्त वाढली नाही. यामुळे येथे जास्त नुकसान झाले नाही. मात्र ऋषिगंगा वीज प्रकल्पात काम करणारे सुमारे दोनशे लोक तेथेच अडकले. यामध्ये मजदूरांमपासून प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
धौलीगंगाने NTPC प्रकल्प उद्ध्वस्त केला
हिमकडा तुटल्याचा परिणाम ऋषिगंगानंतर तपोवन भागातील धौलीगंगा नदीत देखील पाहायला मिळाला. धौलीगंगा आणि ऋषिगंगा दोन्ही नद्या पाच किलोमीटरच्या परिघात आहेत. धौलीगंगा नदीकिनारी NTPCचा हायड्रो पावर प्रोजेक्ट सुरू आहे. धौलीगंगाच्या जोरदार प्रवाहात हा प्रकल्प देखील उद्ध्वस्त झाला. येथे काम करणारे सुमारे शंभर ते दीडशे लोक वाहून गेले. पाण्याचा प्रवाह जोशीमठ मलेरिया महामार्गावर पोहोचला होता. येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)चा पूल तुटला. येथेही काही लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांची संख्या अद्याप समजू शकली नाही.
सखल भागात धोका नाही
ऋषिगंगा आणि धौलीगंगाची पाणी पातळी वाढल्यानंतर आसपासच्या नद्यांची देखील पाणी पातळी दुप्पट वाढली. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग सकाळच्या तुलनेत संध्याकाळ होईपर्यंत बराच कमी झाला. यामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांना आता कोणताही धोका नाही. या दोन्ही नद्यांच्या काठी असलेल्या पीपल कोटी, नंदप्रयाग, कर्णप्रयाण, रुद्रप्रयाग, श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये पाण्याची पातळी पूर्वीपेक्षा वाढली आहे. मात्र यामुळे लोकांची कोणतेही नुकसान होणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.