आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ground Report From Coaching Hub Kota, 1 1 Crore Loan On Hostel, Crisis Of Repaying Installments Due To Lack Of Students; Excluding Fees, The Business Is Worth Rs 2,000 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोचिंग हब कोटाहून ग्राउंड रिपोर्ट:होस्टेलवर 1-1 कोटीचे कर्ज, विद्यार्थी नसल्याने हप्ते फेडण्याचे संकट; फीस वगळता विद्यार्थ्यांच्या मार्फत होत असे तब्बल 2 हजार कोटींचा व्यवसाय

पीयूष मिश्रा | कोटा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेबसाइट, कोचिंग अॅप आणि व्हॉट‌्सअॅपवर चालतात सर्व वर्ग

कोरोनाच्या आपत्तीचा परिणाम आता कोटा येथील कोचिंग व्यवसायावरही जाणवू लागला आहे. विद्यार्थ्यांच्या आधारे चालणारी कोटा येथील अर्थव्यवस्थाच ठप्प आहे. येथे फीस वगळता विद्यार्थ्यांच्या मार्फत तब्बल २ हजार कोटींची उलाढाल होत असे. यात खानावळ, होस्टेलची फीस, वाहतूक अशा खर्चांचा समावेश आहे. आज ही कमाई पूर्णपणे बंद आहे. गेल्या वर्षी सुमारे १,७५,००० विद्यार्थी जेईई मेन व अॅडव्हान्स तसेच नीटची तयारी करत होते. आता फक्त ३ हजार विद्यार्थी येथे आहेत. जे आहेत तेही काटकसरीने खर्च करत आहेत. हा भाग आता ओस पडल्यासारखा वाटतो.

कोटा होस्टेल असोसिएशनचे अध्यक्ष नवीन मित्तल म्हणतात, येथे सुमारे सव्वा लाख खोल्या असलेले ३ हजार होस्टेल आहेत. येथे दरवर्षी १२०० कोटींची उलाढाल होत होती. पीजी कोर्सेसमधून ४५० कोटींचा व्यवसाय होत असे. आता हॉस्टेल चालवणाऱ्यांसमोर यासाठी काढलेल्या प्रत्येकी सुमारे १ कोटी कर्जाच्या हप्त्यांचा प्रश्न आहे. हा हप्ता ९० हजार ते १ लाख रुपये महिना असा आहे. कोटामध्ये विद्यार्थीच येणार नसतील तर हप्ते भरणार कसे, हा प्रश्न आहे.

शिक्षकांच्या घरी स्टुडिओ, लेक्चर रेकॉर्ड करून पाठवले जाते

एलेन कोचिंगचे संचालक राजेश माहेश्वरी सांगतात, आम्ही शिक्षकांच्या घरीच रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओ उभारला आहे. याचा फायदा म्हणजे आता फॅकल्टी घरूनच व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून आम्हाला पाठवतात. ते आम्ही टाइम टेबलनुसार विद्यार्थ्यांना पाठवतो.

मुलांसाठी ऑफलाइन स्टडी मटेरियलही पाठवले जाते

मोशन क्लासेसचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन विजय सांगतात, आम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन व्हिडिओ लेक्चरशिवाय इतर मटेरियलही विद्यार्थ्यांना पाठवतो. इतर अनेक कोचिंग सेंटर्स ऑफलाइन स्टडी मटेरियल पाठवतात. जेणेकरून दुर्गम भागात कुणी असतील व रोज ६-८ तास ऑनलाइन वर्ग अटेंड करणे त्यांना शक्य नसेल तर सोय व्हावी.

अडचणींची सोडवणूक, प्रत्येकासाठी कालमर्यादा निश्चित

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ऑनलाइन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग काउंटर आहेत. विद्यार्थी व्हॉट‌्सअॅप नंबर व ग्रुपने जोडलेत. या माध्यमातून विद्यार्थी कधीही समस्या मांडू शकतात. कोचिंग व्यवस्थापनाने या समस्या सोडवण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे बहुतांश समस्या जास्तीत जास्त ६ ते ८ तासांत सोडवल्या जातात.

बायजूसारख्या अॅपशी करार करून नवे रेव्हेन्यू मॉडेल तयार केले

काही संस्थांनी नवा रेव्हेन्यू मॉडेल तयार केले आहे. यात बायजूसारख्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मशी करार करण्यात आला आहे. हे अॅप इंजिनिअरिंग आणि मेडिकल परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करते. यात कोटा कोचिंगने एक पार्टनर म्हणून भूमिका निभावली आहे.

वेबसाइट, कोचिंग अॅप आणि व्हॉट‌्सअॅपवर चालतात सर्व वर्ग

राजेश माहेश्वरी सांगतात, आम्ही विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन ऑनलाइन शिक्षणाचा एक नमुना तयार केला आहे. अगोदर आम्ही ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी सज्ज होतो. त्यामुळे यात आम्हाला अडचणी नव्हत्या. नव्या सेशनमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आता सुमारे १ लाख विद्यार्थी जोडले गेले आहेत. वेब पोर्टल, अॅप आणि व्हॉट‌्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थी व्हिडिओ क्लासमध्ये येतात.

अभ्यासात मदतीसाठी कॉल सेंटर, उपस्थितीची येथूनच मिळते माहिती

कोचिंग संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी कॉल सेंटरची व्यवस्था केली असून कोणताही विद्यार्थी येथे कॉल करून आपली समस्या मांडू शकतो. याशिवाय कॉल सेंटरवरून पालक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवतात. दोन-तीन दिवस एखादा विद्यार्थी वर्गात नसेल तर कर्मचारी त्याच्या घरी पालकांशी फोनवर संपर्क साधतात.