आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ground Report From Kufg : Join The Youth Army, So Change Into The War Memorial, Home Of Military Officers; Officers Are Teaching Children

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:कर्नाटकातील कुर्ग येथे अधिकाऱ्यांच्या घरांचे रूपांतर युद्धस्मारकांमध्ये होतेय, तरुण लष्कराशी जोडलेले राहावेत हा हेतू...

मनोरमा सिंह | बंगळुरू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुर्गने 11 लेफ्ट. जनरल, 20 मेजर जनरल आणि 4 एअर मार्शल दिले

कर्नाटकचे कुर्ग म्हणजे योद्ध्यांची भूमी. प्रत्येक घरातून एक जण लष्करात जाण्याची परंपरा आहे. या भागाने देशाला एकाच वेळी लेफ्टनंट जनरल श्रेणीचे ३ अधिकारी दिले आहेत. आताही तेथील १०० हून जास्त लष्करी अधिकारी देशाच्या संरक्षणात तैनात आहेत. त्यात १० वर महिलाही आहेत. ‘ट्रॅडिशन ऑफ कोदगू सोल्जर्स’चे लेखक व्ही. सी. दिनेश सांगतात की, येथील एकूण ११ लेफ्टनंट जनरल, २० मेजर जनरल आणि ४ एअर मार्शल आहेत. त्यामुळेच कुर्गला ‘लँड ऑफ जनरल’ही म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत लष्कराकडे युवकांचा कल कमी झाला त्यामुळे कुर्ग कुटुंबांच्या मागणीवरून युवकांसाठी युद्धस्मारक आणि ‘वॉल ऑफ हीरोज’ बनवण्यात आले. जनरल थिमैया यांच्या घराचे रूपांतरही युद्धस्मारकात झाले आहे. तेथील लोकांनी कुर्ग वेलनेस फाउंडेशन बनवण्यात आले आहे. त्याद्वारे मॅरेथॉन आयोजित केली जाते. स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांचे चिरंजीव एअर मार्शल नंदा करिअप्पा निवृत्तीनंतर येथेच राहून पर्यावरणाचे काम करत आहेत. कर्नल (निवृत्त) के. सी. सुब्बयाही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. येथील सैनिकी शाळेत प्रथमच ९ विद्यार्थिनींना प्रवेश मिळाला आहे. त्यासाठी ५०० अर्ज आले होते. येथे शाळांत लष्कराच्या समकक्ष प्रशिक्षण मुलांना दिले जाते.

पोशाख योद्ध्यांसारखा, सोन्याची म्यान असलेली तलवार

कुर्ग लोकांचा पारंपरिक पोशाख भारतापेक्षा अगदी वेगळा आहे. पुरुष गुडघ्यापर्यंत असलेले कोट आणि पांढरा दुपट्टा परिधान करतात. सोबत चांदीची किंवा सोन्याची तलवार ठेवतात. महिलाही साडी परिधान करताना निऱ्या मागच्या बाजूला ठेवतात आणि विशिष्ट प्रकारचा पदर ठेवतात.