आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ground Report From The Village Of Girls Reaching The Olympics From Jharkhand ...; News And Live Updates

दिव्य मराठी ग्राऊंड रिपोर्ट:झारखंडहून ऑलिम्पिकपर्यंत पोहोचणाऱ्या मुलींच्या गावातून ग्राउंड रिपोर्ट...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या गावात मुलींना खेळण्यास मनाई होती, आज तेथूनच 26 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू
  • गावातील मैदानात बांबूच्या स्टिकने खेळून सलिमाने तयार केला ऑलिम्पिकचा मार्ग

ज्या गावात मुलींना खेळण्यास मनाई होती, आज तेथूनच २६ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू

रंजित प्रसाद/खुंटी

६० कुटुंबे व ३०० लोकसंख्येचे हेसेल हे खुंटी जिल्ह्यातील असे गाव आहे जेथून २६ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू आल्या आहेत. त्यापैकी १३ त्यांच्या खेळाच्या जोरावर शासकीय सेवेतही आहेत. त्यातीलच एक आहे निक्की प्रधान, जी ऑलिम्पिक खेळणारी झारखंडची पहिली महिला खेळाडू आहे. शासकीय उत्क्रमित उच्च विद्यालय पॅलोलचे माजी शिक्षक व हॉकी प्रशिक्षक दशरथ महातो यांनी सांगितले, या लहानशा गावातील ७३ मुली व १३ मुले क्रीडांगणात आपले कौशल्य दाखवत आहेत. हेसेलमध्ये आधी मुलींना खेळण्यास बंदी होती.

समाज त्याला चांगले म्हणत नव्हता. २०-२२ वर्षांपूर्वी मुलींनी हाॅकी खेळायला सुरुवात केली असता मुली खेळायला लागल्या तर बिघडतील असे ग्रामस्थ म्हणायचे. मुलींशी कोण लग्न करेल. कोच दशरथ महतो यांनाही ग्रामस्थांचा विरोध सहन करावा लागला. त्यांना खेळणे बंद करायची धमकी देण्यात आली. एके दिवशी त्याच गावातील मुलगी पुष्पा प्रधान भारतीय हॉकी संघातून न्यू जर्सी अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व करून परतल्यावर सर्वांचा दृष्टिकोन बदलला.

गावातील मैदानात बांबूच्या स्टिकने खेळून सलिमाने तयार केला ऑलिम्पिकचा मार्ग
नरेंद्र अग्रवाल/संदीपकुमार|सिमडेगा
सिमडेगाजवळील ६०० लोकसंख्येचे बडकीछापर गाव सध्या चर्चेत आहे. गावाची मुलगी सलिमा टेटे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघात सहभागी होत आपले कौशल्य दाखवेल. तिची लहान बहीण महिमा टेटेदेखील राष्ट्रीय हॉकी खेळाडू आहे, तर वडील सुलक्सन टेटेही राज्य पातळीवरील खेळाडू होते. सध्या बंगळुरू शिबिरात घाम गाळत असलेली सलिमा ५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सामन्यात देशासाठी खेळत आहे. मात्र या काळात ना तिच्या गावाची अवस्था बदलली ना तिच्या कुटुंबाची.

वडील सुलक्सन हेच सलिमाचे पहिले प्रशिक्षक होते. परिसरात ते हॉकीमुळे ओळखले जातात. त्यांनी सांगितले की, गावात मुलींसाठी स्वतंत्र सोय नाही. म्हणून गावात हॉकी खेळणाऱ्या मुली कमी होत्या. सलिमा मुलांसोबत हॉकी खेळायची. गरिबीमुळे तिच्याकडे चांगली स्टिक नव्हती. वडीलच बांबूची स्टिक बनवून द्यायचे. सलिमाचा भाऊ अनमोलने बहिणीला पुढे जायला मदत केली. तो एका हॉटेलात काम करतो.

झारखंडमध्ये खुंटी व सिमडेगातील दोन मुली सध्या चर्चेत आहेत. दाेन्ही मुलींनी आंतरराष्ट्रीय हॉकीत झारखंडचे नाव उज्ज्वल केले आहे. खुंटीतील निक्की प्रधान सलग दुसऱ्यांदा भारतीय हॉकी संघातून ऑलिम्पिक खेळेल, तर सिमडेगातील सलिमा टेटे ही पहिल्यांदाच पात्र ठरली आहे. या दोन्ही मुली आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळतील.

बातम्या आणखी आहेत...