आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ground Report From UP, People Are Dying Of Fever And Cough In The Village; Testing And OPDs Are Also Closed

ग्राउंट रिपोर्ट:गावात ताप-खोकल्याने मरताहेत लोक; चाचणी तर दूरच, ओपीडीही आहेत बंद

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचे आकडे लपवल्याचा आरोप झालेल्या यूपीच्या गावातील वास्तव
  • ही स्थिती... पंचायत निवडणुकीत उमेदवारांनी दारूपेक्षा जास्त ताप-खोकल्याची औषधे वाटली

शहरांमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगा लागलेल्या असतानाच गावातील स्थितीही खूपच वाईट झाली आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील १३ गावांमध्ये गेलो. प्रत्येक गावाची १ ते ७ हजार लोकसंख्या. या सर्व गावांमध्ये मागील एक-दीड महिन्यापासून अचानक मृत्यू वाढले आहेत. मरणारे सर्वच ताप-खोकला असलेले होते. त्यांना कोरोना होता का? चाचणीच झाली नाही तर समजणार कसे? कोणते औषध घेतले? शासकीय ओपीडीच बंद असल्याने घेणार कसे? खासगी रुग्णालयात गरीब जाऊ शकत नाहीत, फक्त सडकछापच्या भरवशावर आहेत. या वेळी येथे पंचायत निवडणुकीत उमेदवारांनी दारूपेक्षा जास्त औषधे वाटली यावरूनच तुम्हाला स्थितीचा अंदाज येईल. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ललितपूर जिल्ह्यातील पीरघाट, बालाबेहट, बरोदिया, बमनोरा, कपूरिया, सलैया, दुधई, शहपुरा, गिरेनी, बजरंगगड, ऐरावनी, बछलापुरा आणि बिरघा गावातील प्रत्येक घरात ताप-खोकला आहे.

आरोग्य सुविधा व सरकारची तयारी बघा...
पूर्ण भागात एक महिन्यापासून आरोग्य केंद्रे बंद आहेत. याचाच अर्थ असा की, जोपर्यंत गावातील व्यक्ती जिल्हा मुख्यालयातील कोविड सेंटरमध्ये जात नाही तोपर्यंत शासकीय आकडेवारीत ती ना आजारी म्हटली जाईल ना कोरोना पॉझिटिव्ह. ६० किमीच्या आत ना शासकीय कोविड सेंटर आहे ना चाचणी होते. सडकछाप डॉक्टरांच्या मते ताप- खोकला- सर्दी म्हणजे मलेरिया व टायफाॅइड. त्याच दृष्टीने औषधे देत आहेत व लाेक घेतही आहेत. सध्या तर औषधी दुकानदारही डॉक्टर आहे. ओपीडी बंद असल्याने लोक त्रस्त असल्याचे ललितपूरचे डीएम ए. दिनेशकुमार यांनाही मान्य आहे. ते म्हणतात, याबाबत सरकारला सतत माहिती देत आहोत. चाचणी होत नसल्याबद्दल म्हणतात, झाशीहून चाचणी अहवाल खूप उशिरा येतो. आम्ही याबाबत सतत आरोग्य विभागाला पत्र लिहीत आहोत.

लोकांना मृत्यूचे कारण काय वाटते? याचे उत्तर यूपी- मप्र सीमेवरील गाव पीरघाटची स्थिती बघून मिळेल. येथे तीन वयोवृद्ध झाडाखाली गप्पा करताना दिसतात. बमनोरातील ७८ वर्षांचे दरयाब सिंह, गिरेनीचे सुखलाल आणि बराेदियातील कालुराम. तुम्ही मास्क का घातलेला नाही, कोरोनाची भीती वाटत नाही का? असे विचारले असता ते म्हणाले, गावात कोरोना नाही. सध्या मलेरिया, टायफॉइड, ताप, सर्दी, खोकला असे आजार आहेत. किती जणांना असा आजार आहे? असे विचारल्यावर म्हणतात, प्रत्येक घरात. एखादेच घर राहिले असेल. घरात कुणी आजारी झाल्यास सर्वच आजारी पडतात. लोक कोरोना चाचणी का करत नाहीत? असे विचारल्यावर म्हणतात, ६० किमी लांब ललितपूरला कोण जाईल? आधी लोक गेले होते, गर्दी पाहून परत आले. लॉकडाऊनमुळे बस बंद आहेत. मोटारसायकलीवरून रुग्णास कसे न्यायचे? बछलापूरचे सरपंच रामराजा म्हणता, येथे असे पहिल्यांदाच होत आहे की, मलेरिया आणि टायफॉइडचा एका माणसातून दुसऱ्या माणसात प्रसार होत असून लोक मरत आहेत.

अशा स्थितीत लोक उपचार कसे करत आहेत? याचे खरे उत्तर पीरघाट, बालाबेहट, बरोदिया, बमनोरा, कपुरिया, सलैया, दुधई आणि शहपुरा गावातील स्थिती बघूनच समजते. या गावांची लोकसंख्या १५ हजार आहे. येथे एक आरोग्य केंद्र आहे- बाजा बेहट. तेथील ओपीडी बंद आहे. दिवटीवरील वॉर्ड बॉय पवनलाच लोक डॉक्टर समजतात. सकाळपासून लोक पवनला ताप-खोकल्याचे औषध विचारतात. पवन गावकऱ्यांना तापाचे औषधही देतो. म्हणतो, काय करणार, लोकांची स्थिती बघा, येथून ६० किमी लांब ललितपूर आणि ४० किमी लांब बीना आहे. कसे जाणार? रामराजा म्हणतात, जशी अवैध दारू घेतो तसे ललितपूरमध्ये औषधाच्या दुकानांवरून लपून औषध घ्यावे लागते अशी स्थिती आहे. अामच्या गावातील ९०% लोक तापाने पीडित आहेत. एके दिवशी ललितपूरला गेलो होतो. एका औषधाच्या दुकानातून ताप, सर्दीचे औषध घेऊन आलो. आता तेच लोकांना देत आहोत.

गावांमध्ये कोरोनाने मरणाऱ्यांची संख्या किती असेल? याबाबत भाजपचे माजी नेते नरेंद्र झा सांगतात, मी राजकीय बोलत नाही. मात्र गावकऱ्यांची स्थिती समजून घ्यावी लागेल. सरकारकडे बेड नाहीत त्यामुळे तीन दिवसांपासून चाचण्या बंद केल्या आहेत. ललितपूर जिल्हा ११० किमीत पसरला आहे. गावातच चाचणी व उपचारांची सुविधा व्हायला हवी, नाहीतर मृत्यू थांबणार नाहीत. मरणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली तर समजेल की लोक का मरताहेत. ऐरावनीचे माजी सरपंच जयपाल सिंह म्हणतात, आमच्या गावाची लोकसंख्या ४ हजार आहे. असे ५० लोक मला माहिती आहेत, जे एका महिन्यात उपचाराशिवाय घरातच मेले. एवढे मृत्यू तर वर्षभरातही होत नाही. ऐरावनीतील फुल सिंह व नंदराम सांगतात, कोरोना आहे की नाही हे माहिती नाही. लोक खूपच मरताहेत. रोज चिता पेटत आहेत. दोन महिन्यांपूर्वी आठवड्यात एखाद्याचा मृत्यू व्हायचा, आता तर रोजच. प्रभुलाल राजपूत सांगतात, शासकीय नोंदीनुसार गावातील एकही जण कोरोनाने मेलेला नाही. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या काही दिवसांत जेवढे लोक मेले सर्वांना ताप-खोकला होता.

रेमडेसिविर तर लांबच, पॅरासिटामॉलचाही काळाबाजार... शहपुरातील धुपसिंह सांगतात, गावाची लोकसंख्या ५०० आहे. त्यातील ४०० आजारी आहेत. आसपासच्या गावांचीही हीच स्थिती आहे. औषधाचे दुकान चालवणारे विनय सांगतात, खूप मोठ्या संख्येने लोक तापाचे औषध घ्यायला येत आहेत. बाला बेहटचे बड्डे श्रीवास्तव सांगतात, सडकछाप डॉक्टर १० रुपयांचे पॅरासिटामॉल २०० रुपयांत देत आहेत. काय करणार? गरज आहे, घ्यावेच लागेल.

उपायच तोकडे, लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा?
याचे उत्तर सडकछाप डॉक्टरांच्या दुकानांवरील रुग्णांची रांग बघून मिळते. दुधई गावात लंगडा डाॅक्टर नावाने प्रसिद्ध एक सडकछाप आहे. सकाळी ९ वाजता १०-१२ जण प्रतीक्षा करताहेत. असाच दुसऱ्या गावात बंगाली डॉक्टर नावाने एक सडकछाप आहे. त्याच्या सहायकाचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. येथे नंतर ७० जणांची चाचणी केली असता १० जण पॉझिटिव्ह निघाले. याला एक महिना झाला आहे. त्यानंतर येथे अनेकांचा मृत्यू झाला आहे, मात्र चाचणी एकाचीही नाही.

बातम्या आणखी आहेत...