आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमुई येथील पवनकुमार आणि सिकंदरा बाजार येथील मोनू यादव यांच्या हत्येमुळे बिहारी मजुरांचे पलायन होत असल्याची अफवा पसरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारीत घडलेल्या या घटना प्रत्येक मोबाइलमध्ये पोहोचल्या. इतकेच नाही तर विधानसभेतही बिहारी मजुरांची हत्या आणि हल्ल्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. बिहारच्या पवनची हत्या आणि मोनू यादवच्या आत्महत्येला बिहारींवर तामिळींचे हल्ले होत असल्याचे दाखवण्यात आले.
या सर्व घडामोडींदरम्यान दिव्य मराठीने पवनच्या हत्येमागची खरी कथा जाणून घेतली. यातून कळले की, पलायन करणाऱ्या बिहारी मजुरांची वक्तव्ये आणि मोबाइलवर येणाऱ्या व्हिडिओपेक्षा सत्य वेगळे आहे. आम्ही मृत पवनचा शोध घेत तिरुपूरमधील तिरुमलाईनगरात गेलो. येथे एका छोट्याशा कॉम्प्लेक्सच्या छतावर दोन ओळीत ८-१० खोल्या आहेत. त्यापैकी एका खोलीत रामानी इम्पॅक्समध्ये टेलरिंगचे काम करणारा पवन आपला धाकटा भाऊन नीरजसोबत राहत होता. शेजारच्या खोलीत १५ वर्षांपासून झारखंडचा ड्रायव्हर उपेंद्र धारी राहत होता. घटनास्थळ आणि शेजाऱ्यांच्या जबाबांनुसार, हत्या पवनचा शेजारी उपेंद्र धारीनेच केली आहे. स्वत: नीरजने स्थानिक पोलिसांना ही माहिती दिली आहे. उपेंद्रने कसा मागून वार केला हे एफआयआरमध्ये नीरजने सांगितले.
उपेंद्रचे पत्नीशी भांडण, पवनने टोकल्यावर हत्या या भागात राहणारे ईमुरागल आणि त्याची पत्नी सेल्वाराणीने सांगितले की, उपेंद्र मद्य पीत होता. १९ फेब्रुवारीला मद्याच्या नशेत पत्नीशी भांडू लागला. पवनने त्याला टोकले. थोड्या वेळानंतर तो छतावर कपडे धोणाऱ्या पवनला म्हणाला की, तू माझ्या पत्नीशी का बोलतो? पवन काही बोलायच्या आत उपेंद्रने धारदार शस्त्राने मानेवार वार केले. यानंतर आम्ही वाचवण्यासाठी बोललो तेव्हा तुम्हालाही कापेन, असे म्हणत पळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.