आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Group Of Ministers To Consider Bringing Petrol And Diesel Under GST, Meets In Lucknow On September 17

एक देश-एक दराची तयारी:पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर विचार करेल मंत्रिसमूह, 17 सप्टेंबरला लखनऊत बैठक

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढत असताना एक दिलासादायक वृत्त आहे. पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक गॅस व एटीएफसारखे पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणले जाऊ शकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी मंत्रिसमूह याच आठवड्यात शुक्रवारी पेट्रोलियम पदार्थांसाठी एक देश-एक दराच्या प्रस्तावावर चर्चा करेल. याच दिवशी जीएसटी कौन्सिलची ४५ वी बैठकही आहे.

कोरोना महामारीनंतर कौन्सिलची ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक आहे. मंत्रिसमूहाने केरळ हायकोर्टाच्या आग्रहानंतर हा प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रिसमूहात एकमत झाले तर ते हा प्रस्ताव जीएसटी कौन्सिकडे सोपवतील. नंतर या प्रस्तावावर कधी विचार करायचा हे कौन्सिल ठरवेल.

जीएसटीनंतर सेस शक्य, मात्र त्याचाही फायदाच होईल
जीएसटीमध्ये कमाल स्लॅब रेट २८ टक्के आहे. मात्र, त्यावर अधिभार (तंबाखू उत्पादानांवर २१% ते १६०% पर्यंत आहे) आकारण्याचा पर्याय खुला आहे. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर त्यांच्यावरही सेस लागेलच. मात्र, यानंतरही प्रभावी दर सध्याच्या करांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय यामुळे पेट्रोल-िडझेलवर इनपुट टॅक्स क्रेडिटही मिळू लागेल. यामुळे व्यवसायाच्या खर्चात कपात होऊन दिलासा मिळू शकतो.

बातम्या आणखी आहेत...