आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी 30% पर्यंत नोकऱ्या वाढल्या:​​​​​​​कोरोना महामारी असूनही देशाच्या आउटसोर्सिंग इंडस्ट्रीमध्ये वाढ, डिसेंबरच्या तुलनेत मार्च तिमाहीमध्ये 25% पेक्षा जास्त बिझनेस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021 च्या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत 25% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.

कोरोनामुळे देशाची आउटसोर्सिंग राजधानी बंगळुरूवर परीणाम झाला असला तरीही आउटसोर्सिंग इंडस्ट्रीवर कोणताही वाईट परीणाम झालेला नाही. याउलट, अलीकडील मोठ्या सौद्यांमुळे, नियुक्त्यांमध्ये 30% वाढ झाली आहे. भारताच्या जीडीपीमध्ये आउटसोर्सिंग उद्योगाचे योगदान सुमारे 8% आहे.

इंडस्ट्री लीडर्सनुसार, यामध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये जवळपास 10% ग्रोथ झाली आहे. एप्रिलमध्ये थोड्या अडचणी अवश्य आल्या होत्या, मात्र या अडचणी दूर करण्यात आल्या. कंपन्यांच्या बिझनेसवर कोणताही परीणाम झालेला नाही. या उलट महामारीमुळे अनेक कंपन्यांनी पहिल्यांदाच काम आउटसोर्स करणे सुरू केले आहे. यामुळे भारतीय कंपन्यांची ऑर्डर बुक वाढली आहे.

2021 च्या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत 25% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. कोविडची दुसरी लाट असूनही, आउटसोर्सिंग उद्योगात नोकरीसाठी 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, अशी माहिती देशातील सर्वात मोठी नोकरी देणारी संस्था टीमलाईजने दिली आहे. यावर्षी 10-12% नवीन रोजगार आऊटसोर्सिंग उद्योगातून येण्याची अपेक्षा आहे. 2020 मध्ये भारताच्या आऊटसोर्सिंग उद्योगात 44 लाखाहून अधिक लोक काम करत होते, ज्यांची संख्या यावर्षी वाढून 50 लाखांहून अधिक होईल.

या चार कारणांमुळे आउटसोर्सिंग इंडस्ट्रीमध्ये येत आहे तेजी

  • ऑर्डर वाढल्यामुळे मजबूत हायरिंग सेंटिमेंट
  • हायब्रिड वर्क एनवायरमेंटने कामात अडचण नाही.
  • जगभरात डिजिटल ट्रान्सफॉर्मेंशनमध्ये गुंतवणूक वाढली.
  • सलग काम करण्यासाठी आउटसोर्सिंग वाढली आहे.

टीमलीज डिजिटलचे बिझनेस हेडशिवा प्रसाद नंदूरी यांच्यानुसार, भारताची आउटसोर्सिंग इंडस्ट्रीवर कोविड-19चा कोणताही परीणाम झालेला नाही. सलग हायरिंग वाढत आहे. आमच्याजवळ 100 पेक्षा जास्त क्लाइंट आहेत. ज्यांची हायरिंग सेंटिमेंट खूप मजबूत आहे. कोरोनामुळे काही कर्मचारी आजारी झाले. मात्र बॅकअप असल्याने काही अडचण आली नाही. भारतात आउटसोर्सिंगचे काम वाढत आहे आणि भारतीय कंपन्यांकडून काम दुसरीकडे शिफ्ट झालेले नाही.

  • जागतिक आउटसोर्सिंग बाजार चार वर्षांत 29 लाख कोटी रुपये होईल.
  • जगभरात दरवर्षी 03 लाखांहून अधिक रोजगार आउटसोर्स केले जातात.
  • अमेरिकन कंपन्यांपैकी 59% कंपन्यांनी सांगितले की आउटसोर्सिंगवर महामारीचा परीणाम नाही.
बातम्या आणखी आहेत...