आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (GSRTC) चा 40 वर्षीय ड्रायव्हरने छातीत वेदना असूनही 15 किमी बस चालवली. मात्र, डेपोत पोहोचताच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. राधनपूर येथे सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली. चालक भारमल अहिर यांनी छातीत दुखणे आणि त्रासाकडे दुर्लक्ष करून 20 मिनिटे बस चालवत होते, असे कंडक्टर दिनेश देसाई यांनी सांगितले. त्यांना प्रवाशांना अर्ध्यावर सोडायचे नव्हते. बस राधानपूर आगारात येताच ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी राधानपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
छातीत दुखत असूनही दिले कर्तव्याला प्राधान्य
भारमल अहिर रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास बसने सोमनाथहून निघाले आणि सोमवारी सकाळी 7.05 च्या सुमारास राधानपूरला पोहोचले. सोमवारी सकाळी राधानपूरपासून 15 किमी अंतरावर असलेल्या वाराहीजवळ त्यांनी प्रवाशांना चहा-पाणी घेण्यासाठी बस थांबवली. कंडक्टर दिनेश देसाई यांनी सांगितले की, भारमल अहिर यांनी येथून बस सुरू केली तेव्हा त्यांच्या छातीत दुखत होते, त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयात नेण्याची गरज आहे अन्यथा काही बरेवाईट होईल. मात्र, प्रवाशांना त्रास नको म्हणून त्यांनी स्वत:च बस 15 किमी चालवली. त्यांनी या वेदनांकडे दुर्लक्ष केले नसते तर कदाचित ते जगले असते. आम्ही बस डेपोत 15 मिनिटे उशिरा पोहोचलो आणि त्यानंतर ते जागेवरच कोसळले.
आगार व्यवस्थापक विशाल गोहिल यांनी सांगितले की, चालकाला नुकतेच कायम करण्यात आले होते. बस राधनपूर आगारात पोहोचल्यावर कंडक्टरने कंट्रोलरला फोन करून भारमल अहिरची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. तोपर्यंत भारमल अहिर पडले होते. त्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना राधानपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नुकतेच नोकरीत झाले होते कायम
भारमल अहिर यांच्या पश्चात पत्नी राया आणि 12 वर्षांचा मुलगा अमूल आणि 3 वर्षांचा दिक्षांत असा परिवार आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते ठराविक पगारावर काम करत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वीच त्यांना नोकरीत कायम करण्यात आले होते. त्यांचे मामा जतीनभाई म्हणाले की, ते रात्रभर गाडी चालवत होते, त्यांना प्रवाशांना त्रास होऊ द्यायचा नव्हता. प्रवाशांना राधानपूरला घेऊन त्यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रवाशांना आगारात आणले, पण ते स्वतःला वाचवू शकले नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.