आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी संकलनात वाढ:फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन 1.49 लाख कोटी रुपये, 12% वाढ

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा फेब्रुवारी महिन्यात जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये इतके झाले. ते गेल्या वर्षापेक्षा १२% जास्त आहे. तथापि, जानेवारीच्या तुलनेत कमी आहे. जानेवारीत १.५७ लाख कोटी रुपयांचे संकलन झाले होते. ते दुसरे सर्वोच्च होते. एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी संकलन १.३३ लाख कोटी रुपये होते. मंत्रालयाने सांगितले की, फेब्रुवारीत २८ दिवस असल्याने संकलन इतर महिन्यांपेक्षा कमी होते. अर्थ मंत्रालयाने सांगितले, फेब्रुवारी २०२३ मध्ये उपकर म्हणून ११,९३१ कोटी रुपयांचे संकलन झाले. हे जीएसटी लागू झाल्यानंतरचे सर्वाधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...