आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौदलास मिळाली पी-15 बी स्टेल्थ:गाइडेड क्षेपणास्त्रनाशक युद्धनौका, अणुयुद्ध झाल्याच्या स्थितीतही लढू शकेल भारतीय नौदल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय नौदलात पी-१५बी स्टेल्थ-गाइडेड क्षेपणास्त्र नाशक ‘मोरमुगाओ’ युद्धनौका रविवारी समाविष्ट करण्यात आली. या नौकेची लांबी १६३ मीटर व रुंदी १७ मीटर आहे. याची ७४०० टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. ती भारतात निर्मित सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक असू शकते. कमीशनिंग सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार उपस्थित होते.

अणु, जैविक आणि रासायनिक (एनसीबी) युद्धात लढू शकते ‘मोरमुगाओ’ युद्धनौका. जमिनीवरून जमिनीवर आणि हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह आधुनिक शस्त्रांनी परिपूर्ण.

30 सागरी मैलाहून अधिक वेग 04 गॅस टर्बाइनद्वारे चालवली जाते. 75 टक्के सामग्री स्वदेशी आहे.

बातम्या आणखी आहेत...