आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Guideline Of Lockdown 3 News And Updates: Approval To Open Yoga Institute And Gym From August 5

1 ऑगस्टपासून अनलॉक-3:देशभरातील नाइट कर्फ्यू हटवण्यात येईल, 5 ऑगस्टपासून योगा इंस्टिट्यूट्स आणि जिम उघडण्यास मंजूरी, शाळा-काॅलेज 31 ऑगस्टपर्यंत बंदच

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • स्वातंत्र्यदिनी सोशल डिस्टेंसिंग आवश्यक, या दरम्यान मास्क घालणे गरजेचे

गृहमंत्रालयाने अनलॉक-3 ची गाइडलाइन बुधवारी जारी केली आहे. गाइडलाइननुसार, रात्री फिरण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. यासोबतच 5 ऑगस्टपासून जिम आणि योग संस्थांना सुरू करण्यासही परवानगी असेल.

अनलॉक-3 मधील सवलती

 • नाइट कर्फ्यू हटवण्यात आला.
 • 5 ऑगस्टपासून योग संस्था , जिम उघडण्यास मंजूरी. एसओपीचे काटेकोरपणने पालन करावे लागेल. सोशल डिस्टेंसिंग अनिवार्य.
 • स्वातंत्र्यदिनी सोशल डिस्टेंसिंग आवश्यक. या दरम्यान मास्क घालणे गरजेचे.
 • वंदे भारत मिशन अंतर्गत ठराविक ठिकाणी इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हलला मंजूरी.
 • कंटेनमेंट झोन बाहेर मेट्रो, सिनेमा हॉल, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजक आणि शैक्षणिक कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर गोष्टींना मंजूरी.

कंटेनमेंट झोनसाठी गाइडलाइन

 • कंटेनमेंट झोनमध्ये 31 जुलैपर्यंत कडक लॉकडाउन लागू करावा.
 • राज्य सरकारने कंटेनमेंट झोनबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कंटेनमेंट झोनबद्दलची माहिती वेबसाइटवर दिली जाईल.
 • फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी असेल.
 • राज्य सरकारने प्रत्येक गोष्टींवर बारील लक्ष ठेवावे. या झोनसाठी दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे.