आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Guidelines Issued By The Election Commission For Holding Elections During The Corona Period

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकांसाठी गाइडलाइन्स जारी:उमेदवाराला ऑनलाइन अर्ज भरण्याची मुभा, प्रचारादरम्यान मास्क घालणे बंधनकारक

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारी निर्देशांनुसार सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल

निवडणूक आयोगाने कोरोना काळात निवडणुका घेण्यासाठी जारी केल्या गाइडलाइन्स. नवीन गाइडलाइन्सनुसार, मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि थर्मल स्कॅनरसारख्या वस्तु निवडणुकीदरम्यान महत्वाच्या असतील. याशिवाय आयोगाने ऑनलाइन नॉमिनेशन फॉर्म भरण्याची सुविधादेखील दिली आहे.

सामान्य गाइडलाइन्स

  • निवडणुकीवेळी कोणत्याही कामादरम्यान मास्क घालावा लागेल.
  • इलेक्शनसाठी वापरण्यात येणार्या रुम, हॉल किंवा कोणत्याही परिसरावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायजर, साबन आणि पाणी ठेवावे लागेल. प्रत्येकाची स्कॅनिंग होईल.
  • सरकारी निर्देशांनुसार सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल. यासाठी मोठा हॉल किंवा परिसराचा वापर करावा लागेल.
  • निवडणूक अधिकारी, सुरक्षेतील कर्मचारी यांच्यासाठी ट्रांसपोर्टेशनदरम्यान वाहने ठेवणे गरजेचे असेल.

ईव्हीएम/व्हीव्हीपॅट

  • पहिल्या आणि दुसऱ्या ईव्हीएमसंबंधित प्रत्येक काम मोठ्या हॉलमध्ये व्हायला हवे.
  • सॅनिटायजरचा मोठा साठा करावा लागेल.
  • ईव्हीएम/व्हीव्हीपॅटला सांभाळणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ग्लव्ज घालावे लागतील.

नॉमिनेशन प्रॉसेस

  • नॉमिनेशन फॉर्म ऑनलाइन दिले जातील. उमेदवार फॉर्म ऑनलाइनदेखील भरू शकतात.
  • शपथपत्रही ऑनलाइन भरता येईल. त्याची प्रिंट आपल्याकडे ठेवता येईल. नोटरीकरणानंतर त्याला निवडणूक अर्जासोबत अधिकाऱ्याला देता येईल.
  • उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने डिपॉझिट भरू शकतील.
  • नॉमिनेशन फॉर्म भरताना उमेदवारासोबत दोनपेक्षा जास्त लोक नसावेत. त्यांना दोनपेक्षा जास्त गाड्या घेऊन फिरण्याची परवानगी नसेल.
  • उमेदवारांना वेगवेगळ्यावेळी बोलवण्यात येईल.

पोलिंग बूथ

  • एका पोलिंग बूथवर 1500 ऐवजी 1000 मतदार बोलवले जातील.
  • मतदानापूर्वी पोलिंग स्टेशन सॅनिटाइज केला जाईल.
  • प्रत्येक बुथच्या एंट्री पॉइंटवर थर्मल स्कॅनर लावला जाईल. प्रत्येकाची थर्मल स्क्रिनींग होईल.
  • ज्या मतदाराचे तापमान जास्त असेल, अशांना शेवटच्या तासात मतदान करता येईल.

पोस्टल बॅलटद्वारे मतदान कोण करू शकेल?

  • दिव्यांग
  • 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदानर
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी
  • कोरोना पॉझिटिव्ह किंवा कोरोना संशयित

निवडणूक प्रचार कसा होईल ?

  • घरोघरी जाऊन प्रचार करताना पाचपेक्षा जास्त लोकांना सोबत ठेवता येणार नाही.
  • रॅलीदरम्यान 5 गाड्या असतील. अर्ध्या तासानंतर अजून 5 गाड्या जाऊ शकतील. दोन गाड्यांमध्ये शंभर मीटरचे अंतर असावे.