आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gujarat: A Fire Breaks Out At An Oil And Natural Gas Corporation (ONGC) Plant In Surat. Fire Tenders Present At The Spot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्घटना:ONGC प्लान्टमधील एकापाठोपाठ तीन स्फोटांनी सूरत हादरले; स्फोटाचा आवाज ऐकून अर्ध्यारात्री घराबाहेर आले लोक, आकाशात उठले आगीचे लोळ

सूरत8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार तासांच्या परिश्रमांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

गुजरातमधील सूरतमधील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या प्लांटमध्ये बुधवारी रात्री उशीरा आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या वृत्तानुसार या स्थळी एकापाठोपाठ एक तीन भीषण स्फोट झाले. या स्फोटानंतर आगीचे मोठेमोठे लोळ आकाशात उठले.

हे स्फोट एवढे भीषण होते की, याचा हादरा 3-4 किलोमीटरपर्यंत बसला. सुदैवाने सुरतच्या ONGC हजारिया प्लान्टमध्ये लागलेल्या आगीत सुदैवानेजीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आता यश आले आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जवळपास तीन वाजता ओएनजीसी हजीरा प्लांटमध्ये सलग तीन स्फोट झाले. या स्फोटाचा आवाज अनेक किलीमीटर दूर ऐकू गेला. या घटनेने संपूर्ण सूरत हादरले. अनेक लोक स्फोटाचा आवाज एकूण घराबाहेर आले. आकाशातील आगीचे लोळ पाहून सर्वच घाबरले. यानंतर अग्निशमन दलाने दाखल होत आग विझवली. जवळपास चार तासांच्या परिश्रमांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

बातम्या आणखी आहेत...