आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमध्ये क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान एका GST अधिकाऱ्याचा अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अहमदाबादच्या शांतीनिकेतन मैदानावर जीएसटी अधिकारी वसंत राठोड रविवारी सकाळी अहमदाबादमध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळत होते. गोलंदाजी करताना छातीत तीव्र वेदना झाल्यामुळे ते जमिनीवर बसले आणि काही क्षणातच कोसळले. काही मित्रांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला.तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दोन तरुणांचा मृत्यू
असेच एक प्रकार गेल्या रविवारीही समोर आले होते. राजकोट आणि सुरतमध्ये क्रिकेट खेळत असतानाच दोन तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खेळल्यानंतर काही वेळातच दोघांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
राजकोटमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता
भरत बरैया (21) हा आपल्या बहिणीच्या लग्नासाठी गुजरातच्या डीसा शहरातून राजकोटला आला होता, तो आजूबाजूच्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. क्रिकेट खेळून घरी परतत असताना वाटेत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
24 वर्षीय कॉन्स्टेबलचा जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गेल्या काही महिन्यांपासून जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असेच एक प्रकरण हैदराबादमध्ये घडले आहे, येथील एका जिममध्ये व्यायाम करताना गुरुवारी एका पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 24 वर्षीय विशाल असे मृताचे नाव आहे.
या घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये विशाल पुशअप करताना दिसत आहे. यानंतर विशाल वॉर्म अप करतानाही दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की, वॉर्मअपच्या वेळीच विशालच्या छातीत दुखू लागते. विशाल जिम मशीनच्या मदतीने स्व:ताला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण अवघ्या 15 सेकंदात त्याचा मृत्यू होतो. येथे वाचा संपुर्ण बातमी.
हार्ट अटॅकने अवघ्या 5 सेकंदांत मृत्यू, VIDEO
हैदराबादमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्या मुलाला हळद लावताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
ह्रदयविकाराचा झटका आला अन् स्टेजवरून पडला
कर्नाटकमध्ये स्टेजवर सादरीकरण करत असतानाच एका कलाकाराचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारची आहे. कर्नाटकच्या मंगळुरूत कतीलू मेळा सुरु आहे. स्टेजवर अनेक कलाकार नृत्य करत होते. तेव्हा अचानक एका कलाकाराला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो स्टेजवरून खाली कोसळला. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.