आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gujarat Ahmedabad Lockdown Update | Ahmedabad Night Curfew Guidelines; Night Curfew In Ahmedabad As COVID Cases Rise

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीकेंड कर्फ्यू:अहमदाबादमध्ये वीकेंड कर्फ्यू जाहीर होताच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची बाजारात गर्दी; सरकारचे अपील-घाबरू नका हे लॉकडाउन नाही

अहमदाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदाबादमध्ये शुक्रवारी रात्री 9 वाजेपासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे

कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे अहमदाबादेत शुक्रवार (20 नोव्हेंबर) रात्री 9 वाजेपासून सोमवार (23 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजेपर्यंत (57 तास) कर्फ्यू लावण्यात आला आहे. परंतू, संपूर्ण शहरात मोठा लॉकडाउन लावणार असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी गरजेच्या वस्तु घेण्यासाठी बाजारात तोबा गर्दी केली.

गर्दीमुळे कोरोना अजून वाढू शकतो

मॉलपासून मार्केट आणि भाजी मंडीमध्येही प्रचंड गर्दी झाली आहे. या गर्दीतूनच कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारात लोक मास्क वापरणे आणि सोशल डिस्टेंसिंगसारख्या निकयमांचे पालन करताना दिसत नाहीत. या गर्दीमुळे पालिकेकडून अनेक दुकाने सील करण्यात येत आहेत.

गुजरातमध्ये लॉकडाउनची अफवाह - सीएम रूपाणी

संपूर्ण गुजरात राज्यात परत लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरली आहे. यावर लक्ष न देण्याची अपील मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी केली आहे. राज्यभर लॉकडाउन लागणार नाही. अहमदाबादमधील हा फक्त वीकेंड कर्फ्यू आहे, जो आज रात्री 9 पासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत असेल.

बातम्या आणखी आहेत...