आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पुन्हा एकदा "मौत का सौदागर"चा नारा गाजत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशी टीका केली. वाघेला सध्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. पण त्यांचे सुपुत्र महेंद्रसिंह वाघेल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात आहेत.
गुजरात विधानसभेसाठी सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांवर 833 उमेदवार मैदानात आहेत.
सर्वप्रथम वाघेलांच्या मोदींवरील विधानाच्या 3 मोठ्या गोष्टी...
1. मतदारांना व्यापार समजतो
वाघेला एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, '1 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये झालेले मतदान भाजपविरोधी व बेचव होते. 5 डिसेंबर रोजी भाजपचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. गुजरातच्या जनतेला व्यापार चांगला समजतो. त्यांचे भविष्य काय असावे हे त्यांना समजते.'
2. BJPचा यंदा पराभव होणार
ते म्हणाले - 27 वर्षांपासून राज्यावर शासन करणाऱ्या भाजपने केवळ हिंदू-मुस्लिमांचे राजकारण केले. छोट्या छोट्या गोष्टींचे भूत बनवले. विकासाला डावलून केवळ बाष्कळ गप्पा हाणल्या. याला लोक कंटाळलेत. त्यामुळे या पक्षाचा यंदा गुजरातमध्ये दारुन पराभव होईल.
3. मार्केटिंग करण्याची त्यांना जुनी सवय
यावेळी वाघेलांना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर अवमान केल्याचा आरोप केल्याचे सांगितले असता ते म्हणाले - "अशी मार्केटिंग करण्याची त्यांची जुनी सवय आहे. खरगे हे म्हणाले, प्रियंका अशा म्हणाल्या, सोनियांनी मौत का सौदागर म्हटले. सोनियाच नव्हे तर मी सुद्धा मोदींना "मौत का सौदागर" म्हणेल. कारण, ते अहमदाबादमध्ये मृतदेहांची शवयात्रा काढणार होते. मग ते "मौत के सौदागर" नव्हे तर काय आहेत?"
काँग्रेस अध्यक्ष मोदींना रावण म्हणाले होते
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सातत्याने मोदींवर निशाणा साधत आहे. अहमदाबादेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते - मोदींचे रावणासारखे 100 तोंड आहेत का? हे मला समजत नाही. यापूर्वी त्यांनी स्वतःचा उल्लेख अस्पृश्य, तर मोदींचा उल्लेख खोट्यांचे सरदार म्हणून केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.