आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधींची एन्ट्री:सुरत आणि राजकोटमध्ये जाहीर सभा घेणार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाच गुजरातमध्ये येत आहेत. सोमवारी ते सुरत आणि राजकोटमध्ये दोन सभांना संबोधित करणार आहेत. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी आतापर्यंत काँग्रेस पक्षाचा एकही मोठा नेता गुजरातमध्ये आलेला नव्हता. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधीही येत्या काही दिवसांत गुजरातमध्ये येणार आहेत.

पीएम मोदींच्या तीन जाहीर सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज ते सुरेंद्रनगर, जंबुसर आणि नवसारी येथे जाहीर सभा घेणार आहेत. तर काल सकाळी त्यांनी वेरावळ येथील बाबा सोमनाथाचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. यानंतर त्यांनी वेरावळ, धोराजी, बोताड आणि अमरेली येथे चार जाहीर सभा घेतल्या. यानंतर सायंकाळी अहमदाबादच्या भाजप कार्यालय 'कमलम'मध्ये पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली.

अमरेलीमध्ये केजरीवाल यांचा रोड शो
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे स्टार प्रचारक अरविंद केजरीवाल आज गुजरातमधील रॅलीदरम्यान रोड शो करणार आहेत. पाटीदारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमरेलीमध्ये अरविंद केजरीवाल रोड शो करणार आहेत. आम आदमी पक्षाच्यावतीने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि संजय सिंह हेही गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. हे सर्व नेते विविध भागात निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

अमित शहा यांच्या जाहीर सभा
द्वारकाच्या खंभलिया विधानसभा मतदारसंघात अमित शाह निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी येथून रिंगणात आहेत. अमित शहा यांच्या आज कोडिनार, माळीया आणि भुजमध्ये निवडणूक प्रचारसभा होणार आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज तीन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.

1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान
राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची राजपत्र अधिसूचना 5 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी 10 नोव्हेंबरला जारी करण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी 15 नोव्हेंबरला छाननी होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 18 नोव्हेंबर आहे. पहिल्या टप्प्यासाठी 17 नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 21 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...